मुंबई

अन्याय विरुद्ध लढण्याची धमक भिम आर्मी मध्येच , नेहाताई शिंदे यांचे प्रतिपादन तर दलित , मुस्लिम ओबीसी नी एकत्र यावे – दीपक हनवते चे आव्हान

Advertisements
Advertisements

मुंबई – प्रतिनिधी 

देशात सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी रोज कुठे ना कुठे दलितांची कुचंबणा हत्या होत च आहे दलिताच्या हत्याकांड बद्दल केवळ सोशल मीडिया व आंदोलन मोर्चे घेऊन चालणार नाही न्याय मिळेपर्यंत लढाई चालूच ठेवली पाहिजेत यासाठी माणसामध्ये अन्याय विरुद्ध लढण्याची धमक निर्माण झाली पाहिजेत त्यासाठी भिम आर्मी भारत एकता मिशन चे प्रमुख,ऍड भाई चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वात संबंध महाराष्ट्र मध्ये भिम आर्मी आक्रमक पद्धतीने लढा उभारून होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिउत्तर देणार असे प्रतिपादन भिम आर्मी च्या महाराष्ट्र प्रमुख नेहा ताई शिंदे यांनी गन्ध कुटी बुद्धविहार अंबोज वाडी मालवणी गेट न 8 मालाड मुंबई या ठिकाणी भिम आर्मी उत्तर मुंबई जिल्हा आयोजित संघटनात्मक बांधणी व जाहीर प्रवेश कार्यक्रम मध्ये बोलताना सांगितले .तसेच या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित असलेले मुंबई प्रमुख दीपक भाऊ हनवते यांनी या देशात दलित मुस्लिम ओबीसी नी एकत्र आल्यास देशाची सत्ता केंद्र आपल्या हाती येईल व खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेकर यांचे शासन करणारी जमात बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल करिता जास्तीत जास्त बहुजनांनी भिम आर्मीत सामील व्हावे असे आव्हाहन केले .

यावेळी विभागातील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागचे वॉर्ड अध्यक्ष सतीश साबळे यांनी आपल्या कार्यकर्ते समवेत भिम आर्मी मध्ये प्रवेश केला .सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले फाईट फॉर राईट फाउंडेशन चे प्रमुख विनोद घोलप यांनी सुद्धा भिम आर्मीत लढण्याची खरोखर ताकत असून त्या दिशेने भाई चंद्रशेखर आजाद कडे तरुणवर्ग आकर्षित होत आहेत असे मत व्यक्त केले .यावेळी उत्तर मुंबई जिल्हा प्रमुख सुरेश वाघमारे यांनी भिम आर्मी ची संघटनात्मक बांधणी जिथे अत्याचार होईल तिथे टीम धावून जाऊन गुन्हेगारी चा प्रतिशोध घेतल्याशिवाय शांत राहणार नाही अशी बंडखोर टीम उत्तर मुंबईत निर्माण करू असे वरिष्ठाना आश्वासन दिले , आयोजित केलेल्या कार्यक्रमात भिम आर्मीचे जेष्ठ भिम सैनिक सुदेश शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला व उपस्थित भिम आर्मीचे पदाधिकाऱ्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास महाराष्ट्र संघटक जयश्री माई सावर्डेकर महाराष्ट्र उपाध्यक्ष पाल, रायगड जिल्हा अध्यक्ष सुरज दोडके . उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष विजय बनसोडे .महिला समन्व्यक प्रियंका वाघमारे .गंध कुटी बुद्ध विहार चे अजित पवार .आशिष जाधव,सुरेश धासरे , ऊर्जा फाऊंडेशन चे प्रमुख विकास वाघमारे ,समाजसेवक अमित गवळी मीरा भाईंदर तालुका प्रमुख सुजित जैसवार .प्रवीण खरात .दिनेश बोराडे आकाश ओव्हाळ, अनिल खाडे, .सोनू गुप्ता .आदी सह भिम आर्मी चे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते सदर कार्यक्रम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ,कैलास आखाडे यांनी केले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मुंबई

मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात – पँथर डॉ राजन माकणीकर

मुंबई –  (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ...
मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया मुंबई , दि. १७ – (प्रतिनिधी) देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत ...
मुंबई

मराठा समाजाला कायमस्वरुपी आरक्षण द्या – राष्ट्रीय स्वराज्य सेना

 मुंबई – सर्वच्य न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात व नोकरी मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आरक्षणास स्थगिती ...
मुंबई

किसान सभेच्या मागण्यांसंदर्भात योग्य निर्णय घेऊ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करून पर्यावरणाचे संवर्धनासाठी आणि वनाधिकार कायद्याच्या जलद अंमलबजावणीसाठी घेतली भेट मुंबई ...