Home विदर्भ माजी आमदार सिरस्कार शेतकऱ्यांच्या बांधावर

माजी आमदार सिरस्कार शेतकऱ्यांच्या बांधावर

212

ढगफुटी चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना फटका

अकोला / आलेगांव , दि. १६ :-  पातूर तालुक्यातील चारमोळी,चोंढी,पाचरण,जांब, पांढुरणा,सावरगाव आदी परिसरामध्ये दि. १३ रोजी ढगफुटी व चक्रीवादळाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान केले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी माजी आमदार सिरस्कार यांनी नुकसान शेतीची पाहणी करून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भ्रमध्वनी द्वारे नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले.

पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या चारमोळी , चोंढी , पाचरण, सावरगाव , जाम , पांढुरणा आदी परिसरामध्ये दि.  १३ रोजी ढगफुटी व चक्रीवादळाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिक नुकसानीचा मोबदला मिळावा या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा बाळापूर विधान सभेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी नुकताच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पिकाची पाहणी केली. पिकाचे भयावह दृश्य पाहून सिरस्कार यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना भ्रमणध्वनी द्वारे नुकसान पिकाचे पंचनामे करण्यास सांगितले. तसेच आदरनिय अजित दादा पवार व अमोलदादा मिटकरी यांच्या समोर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल ठेऊन न्याय देण्याचे काम करेल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सिरस्कार यांनी आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे सांगितले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीराम ताले विजय बोचरे किशोर रौंदळे ज्ञानेश्वर ताले लक्ष्मण खंडारे देवराव बोदळे प्रकाश मांडवकर प्रकाश मांडवकर वामन काठोळे धनराज चव्हाण नारायण बोरकर गजानन लाड अनिल चहा कर दिलीप डोईफोडे राजीव भाई राजू देशमुख हिंमत ताजने गजानन बलक सरपंच सावरगाव बंडू भाऊ धानोरे सरपंच उमरा सुनील तायडे सुनील भाऊ गिरे इत्यादी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.