Home मराठवाडा जालना जिल्ह्यात जमावबंदी मोर्चे, आंदोलने करण्यास प्रतिबंध – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जालना जिल्ह्यात जमावबंदी मोर्चे, आंदोलने करण्यास प्रतिबंध – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

261

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात मोर्चे, आंदोलने, निदर्शने, उपोषणे करण्यावर महिनाभरासाठी बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.त्यानुसार या दरम्यान फौजदारी दंड संहिता १९७ चे कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.त्यानुसार जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय कार्यालयात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास प्रतिबंध घातला असून या दरम्यान कोणालाही कुठल्याही प्रकारचे आंदोलनं करता येणार नाहीत.कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय उपाय योजनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे.