Home जळगाव जळगांव जिल्हाधिकारी यांचे आदेशाला केराची टोपली मोठा वाघोदाच्याच दोन मोटारसायकलस्वारांवर रावेर वाहतूक...

जळगांव जिल्हाधिकारी यांचे आदेशाला केराची टोपली मोठा वाघोदाच्याच दोन मोटारसायकलस्वारांवर रावेर वाहतूक पोलिसाची मेहेरनजर कोरोना महासंकटात कागद टंचाई होती का?

88
0

म्हणून एकाच मेमोपावतीत केली दोघा विना मास्क मोटारसायकल स्वारांची दंडाची ५००/-रपयांची रक्कम कव्हर?

रावेर (शरीफ शेख)

कोरोना संकटकाळी मास्क व सोशल डिस्टन्सिंन कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी व कारवाई चे स्वागत आहे पण मोठा वाघोदा येथील दोन्ही विना मास्क मोटारसायकल स्वारांनी नियम मोडले त्यांना अडवून दंड होणे साहजिक आहे पण नियम व शिस्तीचे धडे गिरविणारे वाहतूक पोलिसाला अचानक च दोन तासभरा नंतर कसा काय फुटला दयेचा पाझर? कायदेशीर विना मास्क वाहनधारकांना ५००/-दंड महाशय जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार आकारण्यात येतो महाशय जिल्हाधिकारी यांनी विना मास्क रस्त्यावर विनाकारण फिरणार्याना ५०० रुपये दंड आकारणी करण्यात यावी असे आदेश काढलेले असतांनाही रावेर वाहतूक पोलिस हे कॉ भागवत धांडे मग या दोघाच मोटारसायकल स्वारांकडूनच प्रत्येकी २५०/-रपये दंडाची आकारणी कशी करण्यात आली? जळगांव जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपली च या महाशयांनी दाखविली पण पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी ही शासन आदेशाचा उल्लंघन करीत दुजोरा देत बाजू मांडली व जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे बारा वाजवत प्रत्येकी मेमोपावती न देता एकाच पावतीत दोघांची मिश्र पावती २५०+२५० एकूण ५००रु.ची कशी बनवण्यात आली ? वाहतूक शाखेतील नियमावलीत तसे आदेश,नोंद अथवा तरतूद आहे का? कायदा व शासनादेश नियमानुसार कारवाई करण्यात आली तर मंग आकारलेल्या रकमेत तफावत कशासाठी ? एकाच गावातील दोघं मोटार सायकल स्वारांनी नियमांचे उल्लंघन केले होते तर दोघांना स्वतंत्र दंड मेमोपावती देण्यात अडचण काय होती ? ६ महिन्यांपासून जनमाणूस कोरोना महामारी ने होरपळलेला असताना जनसामान्यांना अडवणूक करून मने दुखवून जमा केला लाखोंचा निधीची वसुली कितपत योग्य आहे तरी वरिष्ठांनी जातीने लक्ष देवून जनसामान्य वाहनधारकांचा छळ व पिळवणूक थांबवावी अशी मागणी वजा विनंती मोठा वाघोदा येथील रुग्ण पिता,मुलगा व सुज्ञ नागरिकांतून होत आहे.