Home जळगाव सावदा विज वितरण अभियंता खांडेकर यांना सेवेतुन निलंबित करण्याची मागणी

सावदा विज वितरण अभियंता खांडेकर यांना सेवेतुन निलंबित करण्याची मागणी

134

मुख्यकार्यकारी अभियंता कडे पुराव्यानिशी तक्रार

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील सावदा येथील वीज चोरी प्रकरणात केलेली कारवाई ची माहिती घेण्यास सावदा विज वितरण च्या कार्यालयात गेलेल्या तक्रार दारास उडवा उडवी ची उत्तरे देऊन आपण अधिकारी आहे याचे कोणतेच भान न ठेवता भाईगिरीचया भाषेत थेट धमक्या दिल्या ची गंभीर घटना घडलेली आहे. याची पुराव्यानिशी तक्रार मुख्यकार्यकारी अभियंता कडे करून धमक्या देणारे शहर कक्ष अभियंता एच.एल.खांडेकर यांना सेवेतुन निलंबित करण्याची व कायद्या चे कलम 197 प्रमाणे त्यांचे वर गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी तक्रार दार यांनी केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे कि गेल्या काही दिवसा पुर्वी सावदा ता रावेर जि जळगाव येथे गौसिया नगर भागातील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने त्यांच्या मालकीची इमारत बांधकाम साठी एका वर्षा पासून सरकारी वीज तारांवर सर्व्हीस वायर चा आकडा टाकुन वीज चोरी करीत होते. हा गंभीर प्रकार युसूफ शाह सुपडू शाह यांनी पुराव्यानिशी वीज वितरण चे मुख्य कार्यकारी अभियंता
यांच्या कडे तक्रार केली असता शैक्षणिक संस्थेच्या इमारती वर शहर कक्ष अभियंता श्री खांडेकर यांनी छापा टाकुन कारवाई केली.

कार्यालयीन वेळेत शहर कक्ष अभियंता यांच्या कडे दि.07/08/2020 रोजी तक्रार दार व त्यांचे सहकारी मित्र हे माहिती घेण्या कामी गेले असता त्यानी उडवा उडवी ची उत्तरे देत कारण नसताना वाचाळ वक्तव्य करण्यास सुरुवात करून वीज चोरी ची तक्रार तुम्ही वरिष्ठ कडे केली व माझ्या बद्दल काडी केली या मुळे मी तुमच्या वर संतापलो आहे. इतक्या वर न थांबता तक्रार दाराचे नावं घेऊन असे म्हटले की ” युसूफ शाह आपन जबतकर सीधे है सिधे है , उलटे होगये तो अपन किसी के बाप के नही
5.30 बजे तक मै सबका सुनुगा 5.30 बजे के बाद मै किसी का नही ,पुरा नंगा आदमी हु , और बहुत नंगा है फिर मै , ये ध्यान मे रखना तुने , ये बात आखरी का लब्ज …. ”
अश्या प्रकारे भाईगिरीचया भाषेत तक्रार दारास धमक्या देण्याची धक्का दायक घटना सावदा येथील वीज वितरण कार्यालयात घडलेली आहे.
सदरील शहर कक्ष अभियंता खांडेकर यांनी केलेला गैर कृत्य हे तक्रार दार यांच्या वर दबाव टाकण्या खेरिज काहीच नाही.

या मुळे भविष्यात माझ्या जीवा चे कोठेही काही बरे वाईट झाले तर संबंधित अभियंता एच.एल.खांडेकर हेच जबाबदार राहतील व वीज चोरी चा घनिष्ठ प्रकार उघडकीस आणण्यास प्रशासनाची मदत केली, हि माझी चुक आहे का? असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
शहर कक्ष अभियंता यांनी दिलेल्या धमकी चा व्हिडीओ पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड तक्रारी अर्जा सोबत पुरावा म्हणून वीज अभियंता भुषण तळेले कडे सादर केलेला आहे. त्याची प्रत मा.उर्जा मंत्री म.रा. , वीज वितरण चे मुख्य अभियंता जळगांव व जिल्हा पोलिस अधीक्षक जळगांव कडे पाठविले आहे.

भाईगिरीचया भाषेत धमक्या देणारे सदरील अभियंता खांडेकर यांच्या वर वरिष्ठां कडुन काय कठोर कारवाई केली जाईल या कडे सावदा वासियांचे लक्ष लागुन आहे.