Home जळगाव रावेर युवासेनेचे मागणीला यश…!!

रावेर युवासेनेचे मागणीला यश…!!

125

रावेर (शरीफ शेख)

या बाबत युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित आणि युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी या प्रकारची मागणी व तक्रारी केल्याने लागलीच ताबडतोब संबंधितांकडे शेतकऱ्यांच्या व्यथा न मांडत बसत खुद्द महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे या बाबत मागणी केली होती…
दिलेल्या निवेदनाची माननीय कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी लागलीच ताबडतोब निवेदनाची दखल घेऊन या बाबत निर्णय केला असून, पुन्हा “मका” खरेदी केंद्राला सुरुवात झाल्याने शासनाने शेतकऱ्याकडे असलेला मका खरेदी करण्यासाठी पुन्हा परवानगी दिली मिळाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवासेना रावेर यांचे आभार शेतकरी वर्ग यांच्या कडून मानले जात आहेत…

गतवर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांनी मका पेरला होता, त्याचे उत्पादन सुद्धा विक्रमी झाले होते, परंतु मका हमीभाव केंद्राची मुदत समाप्त झाल्या मुळे शेतकरी हवालदिल झाला होता, त्यामुळे शासनाने मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे असे मागणी सर्वच स्तरातून होत होती, त्या अनुषंगाने आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्याशी चर्चा करून मका हमीभाव केंद्राची मुदत वाढवून घेतली, त्यानुसार शासनाने मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू केलेले आहे..

रावेर तालुक्यात मका या पिकाचे उत्पन्न विक्रमी प्रमाणात घेतले जाते त्यात सुमारे 1200 शेतकऱ्यांनी त्यांचा मका शासनामार्फत मोजला जावा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी आपला मका मोजणीसाठी ठेवला होता मात्र संपूर्ण 1200 शेतकऱ्यांचा मका न मोजता अचानक मध्येच 289 शेतकऱ्यांचा मका मोजणी झाल्यावर केंद्र बंद करण्यात आले, या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापी व अन्यायकारक वातावरण निर्माण झाले होते या बाबत आम्हाला समजताच आम्ही लागलीच कृषिमंत्री ना दादाजी भुसे साहेब यांच्या कडे पाठपुरावा करून अवघ्या 10 दिवसांच्या आत कृषिमंत्री यांनी मागणी पूर्ण केल्याने आम्ही रावेर युवासेनेतर्फे कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांचे आभार मानत आहोत व पुन्हा मका खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना होणार नाहक त्रास दूर होऊन सर्व शेतकऱ्यांचा मका मोजला जाईल असा यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रविण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले…!!