Home नांदेड अंतिम मुदतीच्या दिवशी पोर्टलवर ताण येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यास...

अंतिम मुदतीच्या दिवशी पोर्टलवर ताण येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यास विलंब करु नये

93

नांदेड, दि. २६ ( राजेश एन भांगे ) – प्रधानमंत्री पिक विमा भरण्यास शुक्रवार 31 जुलै 2020 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विलंब न करता जवळच्या सी.एस.सी. सेंटरवर, बँकेत किंवा स्वतः पोर्टलवर पिक विमा भरण्यास प्राधान्य देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत फक्त 50 टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. परंतु सध्या शेवटचे 5 दिवस उरलेले असून शेवटच्या 2-3 दिवसात पिक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येतो. मागील काही दिवसात लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा भरु न शकल्यामुळे पिक विमा भरण्यासाठी सीएससी सेंटर 24 तास चालू ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा लवकर भरावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.