Home जळगाव अयाझ मोहसीनचा नशिराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत सत्कार

अयाझ मोहसीनचा नशिराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत सत्कार

152

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्ह्यातील यावल येथील एक ६५ वर्षीय महिला योगिनी पाटील यांच्या प्लेटलेट्स 10 हजार,पर्यंत खाली उतरल्याने अत्यवस्थ झाल्या आहेत व त्यांना अत्यंत तातडीने
प्लेटलेट पाहिजे असल्याचा रात्री १२ वाजता त्यांच्या नातेवाईकांचा फोन आला असता अयाझ ने थोडा विचार केला परंतु लागलीच अयाझ ला १५ दिवसा पूर्वी आपली आई जिचे वय सुद्धा ६५ वर्षाचेच आहे ती आजारी असल्याने आपणास व घरच्यांना किती मानसिक त्रास होत होता म्हणून अयाझ लागलीच इंडियन रेडक्रॉस ला गेला व त्यांनी त्या ठिकाणी त्या आई समान योगिनी पाटील यांना प्लेटलेट दान केले. यामुळे आयाझ चे आज नशिराबाद येथे मेडिकल कॅम्प ची बातमी संकलन ला आले असता ही बाब ग्राम पंचायत सदस्य देवेंद्र पाटील यांच्या लक्षात आली असता त्यांनी त्वरित एक शाल,श्रीफळ व पुष्प गुच्छ मागवून त्यांचे हस्ते शाल टाकून व हाजी गफ्फार मलिक यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.
त्या वेळी उपस्थित फारूक शेख यांनी अयाझ मोहसीन च्या रक्त दान व प्लेटलेट बाबत नशिराबाद करानां माहिती विशद केली असता जोरदार टाळ्यानी त्यांचे कौतुक करण्यात आले.श्री शेख म्हणालेत की अयाज द इंडियन हा आपणा सर्वांना रिपोर्टर, अँकर,क्रिकेट कॉमेंटेंटर म्हणून परिचित आहे मात्र,त्याचा हा मानवतावादी चेहरा सुद्धा अनेकांना माहीत आहे.
हाजी गफ्फार मलिक व ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील यांनी सुद्धा अयाज बद्दल कौतुक पर भाषण केले. अयाझ मोहसीन ने सत्काराला उत्तर देताना,इतरांना मदत करणे ही आपली शिकवण-संस्कार असून रक्तदान प्लेटलेट्स दान हे हिंदू मुस्लिम एकतेचे व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.रक्तदाना मुळे दोन भिन्न धर्मीय कुटुंबात रक्ताचे नाते निर्माण होते,अश्या भावना व्यक्त केल्या व देशासाठी सद्दैव त्याग व बलिदान देण्यास तत्पर आहो,ही गवाही दिली.

हा एक छोटा परंतु प्रेरणादायी कार्यक्रम नशिराबाद ला पार पडला या वेळी सैयद बरकत, डॉ रिझवान खाटीक,रहीम शेख,महेमुद शेख,अबूबकर शेख,फझल शेख, सैयद निसार,यांची उपस्थिती होती.हे रक्तदान-प्लेटलेट्स दान अयाज ने त्याच्या स्वताच्या आईला उत्तम आरोग्यासाठी समर्पित केले.