Home विदर्भ अॅड. शहेजाद समिऊल्ला खान अंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगा तर्फे सन्मानित….!

अॅड. शहेजाद समिऊल्ला खान अंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगा तर्फे सन्मानित….!

70
0

दिग्रस येथील अॅड. शहेजाद समिऊल्ला खान यांना अंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगा तर्फे प्रमाणित करण्यात आले आहे.

यवतमाळ / दिग्रस :- सध्या वीश्वभर चालत असलेल्या कोरोनावायरस किंवा कोविड-१९ या महामारी च्या कहराने समस्त मानवता प्रभावित झाली असुन ह्या महामारी विरुद्ध संपुर्ण जग एक प्रकारचा युद्ध लढत आहे. येवढेच नव्हे तर आपले कोरोनायोद्धा जसे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, पञकार तसेच सरकारी कर्मचारी इत्यादि आपले जीव धोक्यात घालून सुद्धा मानवतेची सेवा करीत आहे.

अशाच प्रकारे दिग्रस येथिल समाजसेवक अॅड. शहेजाद खान यांनी आपल्या मित्र मंडळींना सोबत घेत येथे समाजासाठी कोविड-१९ या महामारी विरुद्ध लढा लढत अगदी शहर निर्जंतूकीकरन कार्यापासुन तर गरजु लोकांच्या वेळोवेळी सहाकार्यापर्यंत विवीध सामाजिक कार्यांमधे भाग घेत लोकांना संतुष्टि देण्याचा पुर्ण प्रयत्न केला.
त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत त्यांना अंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगा तर्फे प्रमाणित करण्यात आले.

अॅड. शहेजाद समिऊल्ला खान हे गोरगरिबांची वेळोवेळी मदद तर करतातच तसेच सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात हे विशेष.

Unlimited Reseller Hosting