Home विदर्भ सुकांत वंजारी यांची राहुल गांधी विचार मंचच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

सुकांत वंजारी यांची राहुल गांधी विचार मंचच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

109

यवतमाळ – गेल्या १० वर्षांपासून राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य शैलीचा ठसा उमटविणारे तसेच मनसे मध्ये विवीध राजकिय पद भुषविणारे सुकांत प्रकाश वंजारी यांची राहुल गांधी विचार मंचच्या शहराध्यक्ष नियुक्ती करण्यात आली.

त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात कोरोणा विषाणुचा प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तुची मदत केली त्यांच्या कार्याची दखल घेत व पुढील राजकिय वाटचालीसाठी राहुल गांधी विचार मंचच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सुकांत वंजारी भारतीय नारी रक्षा संघटना व संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना वेळोवेळी मदत केली त्यामध्ये ज्यांचे लाॅकडाऊनमुळे व्यवसाय , मजुरी बंद असलेल्यांना जिवनावश्यक वस्तु , जेवण पुरविले तसेच बाहेर गावच्या व्यक्तींना रक्त मिळणे कठीण असतांना त्या स्वतः व त्यांचा पत्नीसह रक्तदान करणे , लाॅकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकुन असलेल्याच्या जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे , यासह त्यांनी भारतीय नारी रक्षा संघटन तसेच संकल्प फाउंडेशनच्या वतिने अनेक आदर्श विवाह घडवुन आणले , विशेष म्हणजे सुकांत वंजारी हे १५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी आपले सामाजिक कार्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान प्रबोधन समितीच्या माध्यमातून सुरु केले,तर भिम बिरसा फाउंडेशन,भारतीय नारी रक्षा संघटनेच्या माध्यमातून विवीध उपक्रम राबवण्यात यांचे मोलाचे योगदान आहे.अशा विवीध कार्याची व समाजसेवेची दखल घेत राहुल गांधी विचार मंचच्या शहराध्यक्ष नियुक्ती करण्यात आली. सुकांत वंजारी यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असुन राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ नगर सेवक जावेद अन्सारी यांनी दिलेल्या संधीचे सोने करु तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमेटीची विचारधारा प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांच्या नियुक्ती प्रसंगी शाकिर अहेमद,मकसुद अली,वसीम मवाल आदी मान्यवर उपस्थित होते.