Home कृषि व बाजार सोयाबीन बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करा भाजयुमो…..

सोयाबीन बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करा भाजयुमो…..

188

देवानंद खिरकर

अकोट

आज भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीण तर्फे सोयाबीन च्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हा कृषि अधिकक्ष अकोला यांना अकोलाचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व अकोला पूर्वचे आमदार व अकोला ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर,माझी जिल्ह्याध्यक्ष तेजरावजी थोरात,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची कामे आटोपली असून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची पेरणी केली आहे त्याची उगवण क्षमता अत्यंत निकृष्ठ व कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रावरून बियाणे विकत घेतले व पेरले आहे पण ते बियाणे उगवलेच नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले त्याची उगवण्याची क्षमता ही केवळ 30टक्केच दिसून येत आहे.यामुळे या महामारीचा काळात शेतकरी बांधव आधीच अडचणीत असल्याने आता दुबार पेरणीचे नवीन संकट शेतकरी बांधवांसमोर उभे राहिले आहे.शेतकरी बांधवांनी जिल्हाभरातील ज्या ज्या कृषी सेवा केंद्रावरून ही निकृष्ठ बियाणे खरेदी केली आहेत त्याच कृषी केंद्रांनी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता बियाणे व पेरणीचा खर्च देण्यात यावे व सदर प्रकरणी सविस्तर चौकशी करून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना पाहणी करून ज्या शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाले त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा तसेच संबंधित दोषी कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष सचिनजी देशमुख,जिल्हा सरचिटणीस किरणजी अवताडे,योगेशजी ढोरे,प्रविणजी डीक्कर,अकोट तालुका ग्रामीण अध्यक्ष गोपाळ मोहोड,तेल्हारा ग्रामीण अध्यक्ष पंकज देशमुख,तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश इंगोले,बाळापूर तालुका अध्यक्ष शाम पोहरे,मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष पप्पु मुळे, मूर्तिजापूर शहर अध्यक्ष हर्षल साबळे,कुणाल ठाकूर,अक्षय जोशी,तुषार टाले व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.