Home कृषि व बाजार म्हशी चा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

म्हशी चा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

283
0

 

शेतकऱ्यावर गुन्हा दाखल ,

अमीन शाह

वाढदिवस म्हटला की सेलिब्रेशन आलेच. मग अगदी लहापणी चिमुकल्यांसोबत फुग्यांच्या बरोबरीने केलेले असो किंवा मोठेपणी आदल्या दिवशी रात्री १२ वाजता केक कापून केलेले असो. या दिवसाचे कौतुक काही खासच असते. हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करणे, गिफ्टसचा पडणारा पाऊस आणि केक यांनी साजरा होणारा वय कितीही असले तरी सर्वांसाठीच खास असतो. आता माणसांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे ठिक आहे हो. पण म्हशीचाही वाढदिवस सेलिब्रेट केला जातो. हो, तुम्ही वाचताय ते बरोबर आहे. महाराष्ट्रातील ठाण्यात एका म्हशीचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेल

. मात्र हा बर्थ डे या शेतकऱ्याला आणि त्याच्या मित्राला भलताच महागात पडला आहे . संचारबंदीचे नियम मोडत बर्थ डे साजरा केल्यामुळे किरण म्हात्रे नामक युवकावर थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या किरणभाऊंनी आपल्या म्हशीच्या वाढदिवशी खूप मोठे आयोजन केले ते इतके आनंदित झाले होते की त्यांनी कोरोनाचा धोका पत्करून पार्टी आयोजित केली.होती या सेलिब्रेशनमध्ये बऱ्याच लोकांनीही भाग घेतला . यावेळी कोणीही मास्क घातला नव्हता किंवा सोशल डिस्टेंसिंग चे पालन ही केले नाही
अवघ्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या भल्या झपाट्याने वाढत असताना असे प्रकार चालू आहेत . अखेर या युवकाला म्हशीचा बर्थ डे साजरा करणे भलतेच महागात पडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . आयपीसी कलम 269 ( प्राणघातक संसर्ग पसरवण्याचा कायदा ) या अंतर्गत त्याच्यावर कारवाई होणार आहे .