Home नांदेड मुबारक अली यांचा आनंद पाटील तुपदाळे तर्फे सत्कार.

मुबारक अली यांचा आनंद पाटील तुपदाळे तर्फे सत्कार.

113
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि:१४:- माहूर तालुक्यातील मुबारक अली यांचा आनंद पाटील तुपदाळे तर्फे माहूर काँग्रेस भवन पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला.


व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाव्दारे आयोजित भुवनेश्वर (ओडीसा) येथे ११ मार्च पासुन सुरू झालेल्या ६९ व्या सिनियर नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र हॉलीबॉल संघाच्या कर्णधारपदी मुबारक अली यांची नियुक्ती करण्यात आली असुन माहूर तालुक्यातील तांदळा या छोट्या गावातील मुबारक अली आता व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर करत आहेत. त्या निमित्त माहूर शहर काँग्रेस व माहूर शहरातील नागरिकांच्या वतीने सत्कार करून पेढे वाटण्यात आले. या वेळी माहूर न.प.चे मा.नगराध्यक्ष विधमान न.प.चे गटनेते प्रा.राजेंद्रजी केशवे साहेब,जेस्ट समाजसेवक दत्तात्रय पाटील शिंदे, माहूर शहरातील जेस्ट नागरिक प्रतिष्ठित उधोजक शेख जब्बार शेख रज्जाक, मुनिर भाई,विजय भगत,काँग्रेस पक्षाचे युवा नेते निसार भाई कुरेशी,विद्यार्थी कांग्रेस ता.अध्यक्ष अजीम सैय्यद,करीम शाह, माहूर शहरातील एक प्रतिष्ठित उधोजक दिलीप आरगुलवार,सलमान काजी, अहेमद अली,शेख सद्दाम शेख जब्बार,शेख अझहर,यांच्या सह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.