Home नांदेड नवरा नवरीने ठरवले पहिले पोस्ट बँक खाते नंतर सप्त फेरे

नवरा नवरीने ठरवले पहिले पोस्ट बँक खाते नंतर सप्त फेरे

124

माहूर – दि.१५ माहूर येथे आज केंद्रे परिवारात मोजक्या पाहुने व मित्र परिवारात शुभ विवाह सोहळा साजरा करण्यात आला होता.
हा शुभ विवाह चि. एस. डी. केंद्रे व चि. सौ. का.वैष्णवी मुंडे यांचा होता.
केंद्रे हे केंद्रीय कर्मचारी आहेत.
या नवरा नवरीने सप्त फेऱ्या आगोदर पोस्ट बँकेचे प्रथम खाते उघडूनच नंतर लग्न करण्याचे ठरवले.
नवरदेव केंद्रे यांनी नवरी वैष्णवी यांचा आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक घेऊन पोस्ट बँकेला जोडला व काही सेकंदात पोस्ट बँकेचे डिजिटल बचत खाते नवरीने उघडून QR कार्ड डिजिटल पास बुक लग्न मंडपात देण्यात आले.
नवरा व नवरीने पोस्ट बँक लाभ घेतल्याने आलेले वऱ्हाड देखील पोस्ट बँकेचे उघडून घेतले.
पोस्ट बँकेची खाते उघडण्याचे पूर्ण कार्यक्रम झाल्याने नवरा व नवरीने आपल्या आयुष्यातील जोडीदार सोबत सप्त फेऱ्या मारून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

नांदेडचे डाक अधिक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांनी मोबाईल द्वारे वधू व वारस शुभेच्या दिले आहे.

■ डाक निरीक्षक किनवट श्री.अभिनव सिन्हा व विपणन कार्यकारी अधिकारी श्री. सुरेश सिंगेवार मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड यांनी वधू व वरास मोबाईल फोन द्वारे शुभेच्छा दिले आहे.