Home विदर्भ शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मधील ४०० अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याकडे प्रशासनाचे...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मधील ४०० अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची सेवा नियमित करण्याकडे प्रशासनाचे पहिले पाऊल

139

यवतमाळ , दि. १२ :- वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग मुंबई येथील संचालनालयाकडून सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र प्राप्त झाले आहे.

त्यामध्ये सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांची माहिती मागीतली आहे. सदर माहिती सेवा नियमित करण्यासाठीच मागीवली आहे. पत्रामध्ये स्पष्ट नमुद नसुन त्याबाबत सर्व अस्थायी डॉक्टरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सदर माहीती ही अस्थायी सहाय्यता प्राध्याकांची सेवा नियमित करण्यासाठी असल्यास प्रशासनानचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील जवळपास ४०० पेक्षा जास्त अस्थायी सहाय्यक प्राध्यापक हे कोरोना योध्दा असल्याने त्यांची सेवा नियमित केल्या गेल्यास कोव्हीड १९ मध्ये कार्य करण्यासाठीचे त्यांना बक्षिसच असेल असे म्हणता येईल.