Home जळगाव मनियार बिरादरी ने महापौर भारती सोनवणे यांना अभ्यास दौऱ्याचा अहवाल सादर केला

मनियार बिरादरी ने महापौर भारती सोनवणे यांना अभ्यास दौऱ्याचा अहवाल सादर केला

129

जळगाव करासाठी योग्य कार्रवाई करु – महापौर

एजाज़ गुलाब शाह

जळगाव , दि. १२ :- शहर महानगरपालिका अंतर्गत मुस्लिम इदगाह कब्रस्तान याठिकाणी कोरोना बाधित मृतांचे दफन विधि करणारे शब्‍बीर पटेल, अनिस शाह व इसहाक बागवान यांना तत्पुरते मानसेवी कर्मचारी म्हणून नियुक्ती द्यावी म्हणजे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोणाचे सुरक्षा कवच मिळेल व मालेगाव महानगरपालिकेने ज्याप्रमाणे सामाजिक संघटनेसोबत मिळून तेथील जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांसोबत टायप करून जे कार्य केले त्यामुळे करुणा संक्रमित ८०० रुग्णापासून संख्या कमी होत आज ८० रुग्णापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे जळगाव शहर मनपा यांनी जळगाव शहरातील मुफ़्ती अतीक,फारूक शेख,नदीम काज़ी,अनीस शाह व डॉ जावेद यांनी अभ्यास अभ्यास दौरा करून जो अहवाल तयार केला आहे तो सुद्धा महापौर यांना सदर करण्यात आला या अहवालावर त्वरित योग्य ती कार्यवाही करावी या दोन मागण्यांसह महापौर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन मनियार बिरादरीचे शहराध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर यांच्या हस्ते देण्यात आले त्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फारुक शेख, इदगाह ट्रस्ट चे सहसचिव अनिस शाह, शिकलगर बिरादरीचे व रोशनी मल्टीपर्पज फाउंडेशन चे अन्वर खान व जुलकर नैन आदींची उपस्थिती होती.
महापौर भारतीताई सोनवणे यांनी निश्चितच आपण जळगावकरांसाठी या कोरणासारख्या आजारापासून सुटका होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत करू तसेच कोरोना सारख्या मृत व्यक्तीला दफनविधी करणाऱ्यांना सुद्धा योग्य ते सुरक्षा कवच उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

महापौर भारतीसोनवणे यांना निवेदन देताना सय्यद चाँद, फारूक शेख, अनीस शहा व अन्वर खान दिसत आहे.