Home विदर्भ अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेला सुरुवात

अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेला सुरुवात

175

अमरावती – पावसाळ्याच्या दिवसात पसरणाऱ्या विविध आजारावर वेळीच प्रतिबंध घालता यावा यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे शहरासह तालुक्यातील सर्व गावांमध्ये किटकजन्य रोग नियंत्रण मोहिमेला सुरुवात झाली आहे ही मोहीम उपसंचालक डॉ.फारुखी सर, तसेच सहाय्यक संचालक डॉ. भंडारी सर (हिवताप व हत्तीरोग), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले सर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.हरिष कुंडे सर,जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे.

आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्याविषयी जनजागृती तसेच पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगामध्ये प्रामुख्याने हिवताप,डेंग्यू, चिकन गुनिया आरोग्याच्या दृष्टीने एक मोठी व गंभीर स्वरूपाची समस्या आहे यासाठी पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास डासांची निर्मिती कमी होईल यासाठी वैयक्तिक तसेच सामुदायिक स्वरूपात उपाययोजना राबविण्याचे व आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.हरिष कुंडे यांनी केले आहे.
या मोहिमेची मोर्शी शहरातून सुरुवात करण्यात आली आहे गप्पी मासे सोडणे रक्त नमुने घेणे घरोघरी सर्वेक्षण करणे या कामासाठी आरोग्य सहायक विनायक नेवारे,विनय शेलुरे आरोग्य कर्मचारी प्रकाश मंगळे,डी एम आरलवाड , राधाकिसन वैद्य, राहुल भोसले , प्रशांत बेहरे आहेत.