Home महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकारने विदर्भातील वारकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे….

महाराष्ट्र सरकारने विदर्भातील वारकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे….

183

विदर्भातील सर्व वारकरी संघटनेची मागणी…..

अकोला ,

देवानंद खिरकर
आता काही दिवसांवरच संपूर्ण विश्वाचे दैवत असणाऱ्या भगवान पंढरीनाथांच्या आषाढी सोहळ्याचा पर्वकाळ येत आहे.आणि प्रत्येक निष्ठावान वारकर्‍याची डोळे पंढरपूरच्या वाटेने लागलेले आहेत.परंतु संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने आषाढी सोहळ्या साठी काही पालख्यांना पंढरपुरात प्रवेशाची परवानगी दिली.या निर्णयाबद्दल संपूर्ण वारकऱ्यांच्या मनात आनंद व्यक्त होत आहे.परंतु त्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशातील वारकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे.कारण भगवान पंढरीनाथाची पत्नी व विदर्भ कन्या असलेली आईसाहेब रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचे नाव कुठेही परवानगी यादीत अधिकृत उल्लेख आलेले नाही.महाराष्ट्र सरकारला गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील संपूर्ण वारकऱ्यांच्या व संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.की विदर्भातून प्रमुख पालख्यांमधून फक्त 35 वारकऱ्यांना म्हणजे प्रमुख पालखी सोहळे १६ आहेत.त्यापैकी आईसाहेब रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यात ५ वारकरी व बाकी पालखी सोहळ्यात प्रत्येकी 2 वारकरी म्हणजे एकूण 35 वारकरी मंडळीला पंढरपुरात प्रवेशाची परवानगी देण्यात यावी.या करीता थेट मुख्यमंत्री साहेब.महाराष्ट्राचे राज्यपाल तथा (केंद्रीय मंत्री)खासदार ( पालक मंत्री) आमदार, जिल्हाधिकारी साहेब,या सर्वांपर्यंत निवेदन पाठवलेले आहेत.परंतु अजून पर्यंत महाराष्ट्र सरकारकडून विदर्भा करीता कुठलं उत्तर मिळालेलं नाही.म्हणून पुन्हा एकदा सर्व विदर्भीय वारकरी संघटनेंच्या माध्यमातून मागणी मागत आहोत.की महाराष्ट्र शासनाने दोन एसटी बसेस आमच्या विदर्भात करीता देवुन दि.२९-०६-२०२० ला वारकऱ्यांना पंढरपुरात न्यावे.व १ तारखेला म्हणजे आषाढी एकादशीला भगवंताचे दर्शन करून २ तारखेला परत विदर्भाकडे पाठवावे.त्याचप्रमाणे विदर्भातील वारकऱ्यांची मठ पंढरपूरला बांधलेले आहेत.त्यांना प्रशासनाने नोटीस दिलेली आहे की बाहेरील कुणालाही प्रवेश देऊ नये. तरी किमान 35 वारकरीं करीता हा नियम शिथिल करण्यात यावा.आणि यापुढे पालखी सोहळ्याच्या नियोजन अथवा बैठक होईल त्यावेळेस विदर्भातील जिल्हाधिकारी सर्व वारकरी संघटना प्रमुख व प्रमुख दिंडी चालकांना बैठक मध्ये रीतसर बोलावण्यात यावे.प्रशासन आम्हाला ज्या पद्धतीने किंवा ज्या नियमांनी पंढरपूरला जाण्याकरीता परवानगी देतील त्या सर्व नियमांचे पालन करू आम्ही युवा विश्व वारकरी सेने तर्फे ग्वाही देतो.आमच्या मागणीला आम्ही पूर्णपणे अधिकाराने मागत आहोत त्याच्या मागचे कारण जर तिरुपती बालाजी संस्थान दिवसाला सहा हजार भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात येत असेल तर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आषाढी एकादशीच्या सोहळ्याला विदर्भातील 35 वारकऱ्यांना का परवानगी मिळू नये ?हा आमचा प्रश्न आहे युवा विश्व वारकरी सेना व सर्व वारकरी संघटनांचे प्रमुख पालख्यांसोबत बोलणे झाले आहे. त्या पालख्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
,,कृपया आमच्या मागण्यांची पूर्तता करावी,,
आई साहेब रुक्मिणी माता पालखी सोहळा,श्री संत गुलाबराव महाराज पालखी सोहळा,श्री संत भास्कर महाराज पालखी सोहळा,श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा,श्री संत शिवराम महाराज पालखी सोहळा, श्री संत सखाराम महाराज पालखी सोहळा,श्री संत भोजने महाराज पालखी सोहळा,भवसागर माऊली ट्रस्ट पालखी सोहळा,श्री संत पांडुरंग महाराज पाटकर पालखी सोहळा,श्री संत नरसिंग महाराज पालखी सोहळा,श्री संत सोनाजी महाराज पालखी सोहळा,श्री संत शिवगिरी बाबा पालखी सोहळा,श्री संत दत्तू जी महाराज पालखी सोहळा,महर्षी वाल्मिक पालखी सोहळा,संत नारायण गुरु महाराज पालखी सोहळा.आमच्यावरील पालखी सोहळा मागणीची पूर्तता न झाल्यास विदर्भातील वारकरी संघटनेचे पदाधिकारी स्वतःच्या वाहनाने आईसाहेबांच्या पादुका व संतांच्या चरण पादुका घेऊन पंढरपुरात प्रवेश करतील याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
,,वारकरी संघटना,,
श्री ह भ प गणेश महाराज शेटे
(युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष)श्री ह भ प प्रकाश भाऊ दिवे
(युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र प्रदेश)श्री ह भ प शरद महाराज खंडारे (वारकरी क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश सचिव)ह भ प विजय महाराज सावरकर(वारकरी क्रांतीसेना महाराष्ट्र अध्यक्ष)ह भ प माऊली महाराज मुडेकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष)श्री ह भ प मोहन महाराज मेतकर (युवा विश्व वारकरी संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष)श्री ह भ प राम महाराज गवारे(युवा विश्व वारकरी संघटना (अकोला जिल्हाध्यक्ष)श्री ह भ प श्याम महाराज निचित(वारकरी महामंडळ अमरावती जिल्हा अध्यक्ष)ह भ प सागर महाराज परिहार युवा विश्व वारकरी संघटना (अमरावती उपजिल्हाध्यक्ष)ह भ प सोपान महाराज उकर्डे(युवा विश्व वारकरी संघटना अकोला उपजिल्हाध्यक्ष)ह भ प गजानन महाराज गावंडे(युवा विश्व वारकरी सेना बुलढाणा जिल्हा संघटक)ह भ प गजानन महाराज चराठे कार्याध्यक्ष अमरावती असंख्य वारकरी विदर्भ व आमच्या वारकऱ्यांच्या मागणीकडे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा ही महाराष्ट्र सरकारकडे विनंती करण्यात येत आहे.अन्यथा आमही पंढरपुरात आल्याशिवाय राहणार नाही.