विदर्भ

वर्धा जिल्हयात आज एका नविन कोरोना बाधित रुग्णाची नोंद…

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पोहचली 10 वर.!

वर्धा , दि.22 :- जिल्हयात आज एका नवीन रुग्णाची नोंद झाली असून नवीन रुग्ण आष्टी शहरातील आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना बधितांची संख्या 2 वर गेली असून आतापर्यंत 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 9 आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.
जिल्हयात 11 कोरोना बाधित रुग्णाची नोद झाली आहे यामध्ये वर्धा- 2, वाशिम-1,अमरावती -4, नवी मुबंई-3, गारेखपुर (उत्तरप्रदेश)- 1 रुग्ण असून यापैकी वर्धा येथील एका रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे सध्या 10 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
नवीन रुग्णाविषयी अधिक माहिती.
सदर 22 वर्षीय रुग्ण महिला मुंबई येथून 14 मे रोजी आष्टीमध्ये आली. तिला आणण्यासाठी महिलेचा भाऊ कार घेऊन गेला होता. आष्टीमध्ये आल्यावर आरोग्य विभागाने त्यांचे संपूर्ण कुटुंब गृह विलगिकरणात ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी युवतीला ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्याने तिला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच तिला सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आल्यावर रुग्णासोबतच कुटुंबातील इतर 4 व्यक्तींचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. आज सकाळी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालात सदर रुग्ण कोरोना बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तर हाय रिस्क मधील चार व्यक्तींचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. रुग्णावर कस्तुरबा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार सुरू असून कुटुंबियांना आय टी आय टेकडीवरील कोविड केअर सेंटर मध्ये संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.
मृत्युबद्दल अधिकची माहिती
आज पर्यंत झालेल्या नोंदीनुसार 11 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 1 महिला रुग्णाचा मृत्यू झाला असुन सदर महिला अस्थमा या आजाराने ग्रासीत होती.
प्रयोगशाळा तपासण्या
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 हजार 63 नमुन्यापैकी 1 हजार 2 व्यक्तींचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 11 व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आज 103 व्यक्तींचे स्त्राव कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले असून 50 अहवाल प्रलंबित आहेत.
विलगीकरण
आतापर्यंत जिल्हयात 34 हजार 122 लोक गृहविलगीकरणामध्ये होते त्यापैकी 23 हजार 782 व्यक्तींचा गृहविलगीकरण कालावधी संपुष्टात आला असून सद्यस्थितीत एकुण 10 हजार 340 व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत. तसेच 106 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना
जिल्हयात ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. जिल्हयात सध्या 2 कंटेनमेंट झोन (तालुका आर्वी व आष्टी ) क्रियाशील आहे. एकुण 47 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी आजपर्यंत 11 हजार 535 लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
आष्टी शहरात 4 वार्ड कंटेनमेंट क्षेत्र
तसेच सहा वार्ड बफर झोनमध्ये
मुंबईमधून आलेली आष्टी येथील 22 वर्षीय युवती कोरोना बाधित आढळल्याने आष्टी शहरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केला आहे. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सदर आदेश काढले आहेत.
आज सकाळी सदर रुग्णाची कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णाला सेवाग्राम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णामुळे कोरोनाचा संसर्ग इतर भागात होऊ नये व सार्वजनिक आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या कंटेनमेंट कृती योजनेनुसार कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडलेला भागाच्या आजूबाजूचा 3 किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार आष्टी शहरातील वार्ड क्रमांक 3,4,5 आणि 10 हे प्रतीबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तसेच बफर झोन मध्ये, वार्ड क्रमांक 6, 8, 11 व 12 तसेच पेठ अहमदपूर भाग , नवीन आष्टी वार्ड क्रमांक 2 व 9 हा भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात जाणारे व येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून सदर भागातील नागरिकांना अत्यावश्यक (वैद्यकीय) कामाशिवाय इतर बाबीसाठी बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

बेशिस्तांवर कारवाईचा बडगा , “जिल्हाधिका-यांकडून इर्विन चौकात बेशिस्तांवर कारवाई”

मनीष गुडधे    अमरावती – कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली असतानाही मास्कचा वापर न करता बेपर्वाईने ...
विदर्भ

” सितादही ” पुर्वीच पांढर्या सोन्याला काळा डाग , “आभाळ फाटले”

आयुष्याचा ७\१२कोरा…! कर्जाची चिंता….! भूमिपुत्र हतबल…! मदतीची गरज…! देवानंद जाधव यवतमाळ – सध्या आभाळाच्या सारीपाटावर पावसाचा ...
विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...