Home विदर्भ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे यवतमाळ करांना दूषित...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित पणामुळे यवतमाळ करांना दूषित पाण्याचा पुरवठा

108

भारतीय नारी रक्षा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ – गेल्या अनेक महिन्यापासुन यवतमाळ करांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वारंवार सांगूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे सांगण्यात येत असून दुर्गंधी युक्त दुषीत पाण्याचा विषय ऐरणीवर आला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गंभीर चुकांमुळे यवतमाळकरांना वारंवार दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी पुरवठा होत आहे.यामुळे कोरोना विषाणुच्या संसर्गासह ईतर आजारांने यवतमाळकरांचे यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.निळोणा धरणाजवळील जलशुद्धीकरण केंद्रात अनेक समस्या आहेत. त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचे डोज आठ तासात बारा किलो देणे गरजेचे आहे मात्र यातही हयगय केली जाते तसेच जलशुध्दीकरणाचे बेड बायपास लिकेज असल्याने शुध्द पाणी दुषीत होत असुन दूषित पाणी पुरवठा होत असून तसेच बेडमध्ये गाळ छानण्यासाठी रेतीचा वापर केल्या जाते मात्र रेती व्यवस्थित न टाकल्यामुळे पाणी छानण्यात अडचणी निर्माण होत आहे.तसेच अनेक वाॅल्व नादुरुस्त असुन यातुन दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे.अशा एक ना अनेक अडचणी असुन या करिता जलशुद्धीकरण केंद्राची उच्च स्तरीय समितीकडुन तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.त्या ठिकाणी जलशुध्दीकरणाची महत्वाची जबाबदारी असलेले फिल्टर आॅपरेटर विनोद माळवी कर्तव्यावर असताना निवड झोपा काढत असतांनाचा व्हिडिओ एका प्रतिनिधीच्या हाती लागला असुन हे नित्याचे असल्याने जलशुद्धीकरण केंद्रात जलशुध्दी करण्याचडे साफ दुर्लक्ष होत असून कंत्राटी पद्धतीने असलेल्या कामगारांवर जलशुद्धीकरण सुरू असून या हेल्पर यांना जलशुद्धीकरण याचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना जलशुद्धीकरणाची जबाबदारी दिली जात आहे.त्या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये एकूण तीन परमनंट व्यक्ती कार्यरत असून दहा कंत्राटी कामगार आहे.एका शिफ्टला ४ जण आपले कर्तव्य बजावत असताना हयगय करत आहे असे निर्दशनास आले.या सर्व बाबींची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांना असतांना सुध्दा याचे जलशुद्धीकरण केंद्रावर साफ दुर्लक्ष असल्याने यवतमाळ करांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून आपल्या कार्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यावर कर्तव्यात कसूर करत असुन प्रकरणी चौकशी करुन निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने करण्यात आली असुन निवेदन सादर करते वेळी विनोद दोंदल,सुकांत वंजारी,दुर्गा पटले,वर्षा चव्हाण, संजय शेन्डे आदी उपस्थित होते.