Home विदर्भ लॉकडाऊन काळात एमगिरी च तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर.!

लॉकडाऊन काळात एमगिरी च तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर.!

117

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

दामिनी शेतकरी महिला प्रोड्युसर चा उपक्रम.

वर्धा – लॉकडाउन मुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळद बॉयलर व पॉलिशर मशिन बाहेरून बोलावाने शक्य नसल्याने व या मशिन च्या किमती ही फार असल्यामुळे कमलनयन बजाज फाउंडेशन,वर्धा व नाबार्ड व्दारा संचालित दामिनी वुमन फार्मर प्रोड्युसर कंपनी,देवळी यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी हळद ह्या पिकाचे उत्पन्न घेतले आहे. लॉकडाउन च्या कठीण काळात हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळद पॉलिशर व बॉयलर साठी एमगिरी चे निदेशक डॉ.आर.के.गुप्ता यांनी एमगिरी व्दारा विकसित हळद व बॉयलर ट्रायल साठी द्यावे. अशी विनंती केली असल्याने तातडीने डॉ.आर.के.गुप्ता यांनी एमगिरी च्या उर्जा व अवसंरचना विभागा व्दारा विकसीत हळद बॉयलर व पॉलीशर निशुल्क चाचणी परिक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रियेसाठी लागणारा एक किंटलमागे 300 रु खर्च वाचला आहे.
आत्ता पर्यंत 45 ते 50 क्विंटल हळद बॉईल करुन जवळजवळ 35-40 क्विंटल हळद पॉलिश करण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी नुसार सदर मशिन देण्यात येत असल्याचे दामिनी शेतकरी महिला प्रोड्युसर ने सांगितले. कठीण काळात शेतकऱ्यांना एमगिरी ने जे तंत्रज्ञान दिले त्यामुळे हळद उत्पादन शेतकरी वर्ग सुखावला आहे. ह्या मशिन ची यशस्वी निर्मिती व चाचणीस श्री. रवीकुमार , उप.निदेशक,REI व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सचिन राऊत व तंत्र सहाय्यक गणेश थेरे ह्यांनी केले. या कार्या बद्दल कार्यक्रम अधिकारी महेंद्र फाटे, विभाग अधिकारी विजया ठाकरे, देवळी समन्वयक अश्विनी शेंडे व दामिनी शेतकरी महिला प्रोड्युसर देवळी ने एमगिरी चे अभिनंदन केले.