
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम
औरंगाबाद ,
जेष्ठ समाज सेवक अनिल लुनिया यांच्या माध्यमातून माणुसकी समूह व दृष्टी सोशल फाउंडेशन यांच्या मदतीने औषधांची मदत करण्यात आली.
औरंगाबाद मध्ये लॉकडाऊन च्या कालावधीत कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय रुग्णालय घाटी मध्ये *कोरोना वॉर्ड* करिता उपयुक्त अश्या औषधी आणि मेडिकल साहित्याची माहिती श्रीमती बोरकर मॅडम यांच्याकडून घेऊन एकूण ३६५४३/-
किमतीचे वीवीध औषधे वार्ड क्रमांक १४ मध्ये डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यात आले यावेळी जेष्ट समाजसेवक अनिल लुनिया, माणुसकी समूहाचे अध्यक्ष सुमित पंडित, दृष्टी चे डायरेक्टर दीपक आर्य, ज्ञानेश्वर पंडित रुग्णालयातील डॉक्टर आदी उपस्थित होते…











































