Home मराठवाडा चक्रीवादळ व अवकाळी पावसाने कुसळी येथील शेतकऱ्याची दयनीय अवस्था सह आर्थिक हानी

चक्रीवादळ व अवकाळी पावसाने कुसळी येथील शेतकऱ्याची दयनीय अवस्था सह आर्थिक हानी

105

बदनापूर/सय्यद नजाकत

तालुक्यातील कुसळी येथील एका शेतकऱ्याने अथक परिश्रम घेऊन व सावकार,बँक आदीकडून कर्ज घेऊन कुकुटपालन व्यवसाय सुरू केला होता मात्र 15 मे रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने 2500 पक्षी नृत झाले तर सात ते आठ लाख रुपये खर्च करून बांधलेले शेड देखील पूर्ण तुटून पडल्यानेइ शेतकरी विष्णू काकडे यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे

बदनापूर लुक्यातील कुसळी येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू रामभाऊ काकडे यांच्या गावाशेजारील गट न 253मधील शेतात दोन वर्षांपूर्वी बेरोजगारी वर मात करण्यासाठी सावकारी तसेच नातेवाईक यांच्या कडून आर्थिक मदत घेऊन कुकूट पालन व्यवसाय सुरु केला वर्ष भरात व्यवसायाला भरभराटी मिळाली चांगल्यापैकी पैसा मिळू लागल्याने एका शेडचे दुसरे व तिसरे शेड उभे केले चंगल्यापैकी नफा मिळत असल्याने कुटुंबातील सहा व्यक्ती याना रोजगार मिळू लागला मात्र मागील तीन ते चार महिन्यापासून कोरोनाग्रस्त परिस्थीती असल्याने कुकूट पालनातील 3हजार पक्षी त्यात गावरान 1500 तसेच 1500 बॉयलर पक्षी होते यात शेडच्या बांधकामासाठी 7ते 8लाख रुपये खर्च झाला असून तीन हजार पक्षी तसेच खाद्य यासाठीचा चार लाख खर्च झाला आहे हे उद्योग उभरण्यासाठी यात सावकारी कर्ज तसेच नातेवाईकाकडून पैसे घेतलेले आहे

कुसळी येथील शेतकरी विष्णू काकडे यांनी अथक परिश्रम घेऊन उद्योग सुरू केला होता मात्र 15 मे रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने जवळपास अडीच हजार पक्षी मृत पावले तर शेड देखील तुटून पडल्याने आता सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले पैसे परत करणे शक्य नसल्याने या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बदनापूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ असरार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अनिल दाभाडे तसेच डॉ शेलार यांनी पाहणी करून पंचनामा केला यावेळी सरपंच भाऊसाहेब वैद्य तसेच माजी सरपंच विष्णू काटे, सदस्य ज्ञानेश्वर पवार, यांच्यासह गावकर्यांनी पाहणी केली