Home महत्वाची बातमी महिला जनधन खातेदारांसाठी खुशखबर, सोमवार पासून जमा होणार 500 रुपयांचा दुसरा हप्ता...

महिला जनधन खातेदारांसाठी खुशखबर, सोमवार पासून जमा होणार 500 रुपयांचा दुसरा हप्ता – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणा

82
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात गरीब आणि गरजू नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या घोषणेनुसार महिला जनधन खातेधारकांना सोमवारपासून 500 रुपयांचा आणखी एक हप्ता मिळणे सुरू होईल. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या वेळी गरिबांच्या मदतीसाठी सरकारने महिला जन धन खातेदारांच्या खात्यात दरमहा 500 रुपये तीन महिन्यांसाठी पाठविण्याची घोषणा केली होती. सीतारामण यांनी 26 मार्च रोजी ही घोषणा केली होती. आर्थिक सेवा सचिव देबाशीष पांडा यांनी मे महिन्यासाठी हप्ता पाठविण्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की बँकांच्या शाखांमध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन एक टाइम टेबल तयार करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत महिला जनधन खातेदार बँक खात्याच्या शेवटच्या अंकाच्या आधारे बँकांकडून पैसे काढू शकतात.

यानुसार ज्या महिला खातेदारांच्या खात्याचा शेवटचा आकडा शून्य आहे किंवा 1 आहे. अशा खातेदारांपासून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यांना 4 मे रोजी पैसे काढता येईल. तसेच ज्या खात्यांना शेवटी दोन किंवा तीन अंक मिळतात, ते या योजनेंतर्गत 5 मे रोजी पैसे काढू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांच्या खात्याचा शेवटचा अंक चार किंवा पाच आहे त्यांना 6 मे रोजी पैसे मिळतील. पंतप्रधान जन धन योजना (पीएमजेडीवाय) खातेदार ज्यांचे खाते क्रमांक सहा व सात क्रमांकावर समाप्त होणारा आहे. त्या महिला 8 मे रोजी खात्यातून पैसे काढू शकतात. त्याचबरोबर, ज्यांच्या खात्याचा शेवटचा अंक आठ आणि नऊ क्रमांक आहे, त्यांना 11 मे रोजी दुसरा हप्ता मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.