Home विदर्भ चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांची आरोग्य पथकाव्दारे आरोग्य तपासणी करा – डॉ प्रविण...

चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांची आरोग्य पथकाव्दारे आरोग्य तपासणी करा – डॉ प्रविण धमाने

598

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

गौळ – नाचणगाव आरोग्य केन्द्राकडून कर्मचाऱ्यांची तपासणी.

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यात बांधीत यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातून व्यक्ती येणार नाही यासाठी अंदोरी शिरपूर पुलगांव असे तिन चेक पोस्ट आहेत .येथे दिवसरात पोलीस व कृषी विभागातील कर्मचारी कर्तव्ये बजावित असतात . त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांची आरोग्य पथका व्दारे तपासणी करण्यात यावे असे आदेश देवळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने यांनी दिले आहे .
त्यानुसार पुलगांव चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांची बिपी शुगर सिबीसी ताप इत्यादी तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाने यांच्या निगरानीत तालुका पथक शेख हुसेन प्रमोद धुडे सुर्यकांत वाघुले शरद डांगरे दिलीप उटाणे विकास माणिककुडे दिनेश भगत चिंचोडकर पोले चंदेल यांच्या उपस्थिती मध्ये (३०) एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र नांचणगांव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ तामनकर डॉ आरोग्य सहाय्यक दिनेश भारती स्वाती धोगडी रुपारी नंदेश्वर यांनी केले अंदोरी येथील चेक पोस्टवर प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर आरोग्य सहाय्यक सविता फरताडे दिलीप उटाणे सुमेध वासेकर पुजा नगराडे उषा मांदाडे हुसनाबानो शेख शैलेश चौधरी औषध निर्माण अधिकारी तुषार धाञक आरोग्य पथकानी तपासणी केली शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ गिरी आरोग्य सहाय्यक परतेकी इत्यादी आरोग्य पथकाने तपासणी केली .
वर्धा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले देवळीचे तहसिलदार राजेश सरवदे यांनी बाधीत जिल्ह्यातील व्यक्ती विनापरवानगी येवू नये यासाठी चेक पोस्ट कडक करण्याच्या सुचना दिली आहे
देवळी तालुक्याला कोरोणा बाधीत जिल्ह्यातील व्यक्ती पासून अधिक धोका होवू शकतो त्यामुळे तालुका आरोग्य पथकाने तिन्ही चेक पोस्टवर जावून आढावा घेतला .
विनापरवानगीने येणाऱ्या जवळपास १५ व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आले. त्यात जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत एक ग्रामसेवक दररोज यवतमाळ जिल्ह्यातून वर्धा येथे येणे जाणे करीत आहे त्यांना देखील पुलगांव चेक पोस्ट वरुन वापस पाठविण्यात आले पून्हा आल्यास यवतमाळ सिईओ कडे तक्रार करण्यात येईल असे ताकीद देवून परत करण्यात आले .
पुलगांव येथील अनेक शेतकरी बाधीत जिल्ह्यातील सिमेवरील शेतावर जातात त्याही शेतकऱ्यांना फक्त आपल्या शेतातच जावे बाधीत जिल्ह्यातील गावात गेल्यास गून्हा नोंद करुन दंड घेतला जाईल याची ताकीत देण्यात आली.
चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी दर आठवड्यात करण्यात यावी अशी सुचना आरोग्य पथकाला डॉ धमाने यांनी दिल्या, चेक पोस्ट वरील कर्मचाऱ्यांच्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली तर आरोग्य विभागा कडून ‘ काय अपेक्षा आहेत विचारणा करण्यात आली. आरोग्य तपासणीचा अहवाल तालुका कार्यालयास तात्काळ देण्यात यावा. आरोग्य पथकाने पुलगाव वर्धा नदी वरील जूना पुल पुर्णपणे बंद करण्यात आला आहे.