Home मराठवाडा कोविड १९ कोरोना व्हायरच्या संसर्गात नांदेड जिल्हा नियंत्रणात

कोविड १९ कोरोना व्हायरच्या संसर्गात नांदेड जिल्हा नियंत्रणात

93
0

नांदेड , दि. १६ : ( राजेश भांगे ) – जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन ५०३ तर क्वारंटाईन कालावधी पूर्ण १४० जणाचे झाले आहे. निरीक्षणाखाली असलेले ४३ पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ३९ (yatrinivas CCC) जण आहेत. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले ५०३ जण आहेत. आज तपासणीसाठी ४२ जणांचे नमुने घेतली. एकुण २७४ नमुने तपासणी पैकी निगेटीव्ह २२६ तर नमुने तपासणी अहवाल बाकी ४३ जणांचा असून नाकारण्यात आलेले नमुने ५ आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकुण प्रवासी ७३ हजार ६७९ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड मार्फत देण्यात आली आहे.

Unlimited Reseller Hosting