Home विदर्भ नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

151

तळेगांव (शा.पं.) :- वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंत येथे कोरोना विषानूचा प्रादुर्भाव होेवु नये याकरीता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहे.

त्यामध्ये मार्निंग, इव्हिनिंग वाॅक, मास् न लावणे, विनाकारण फिरणे आदीबाबत दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.

अश्याप्रकारे दि.१५ एप्रिलला तळेगावात मास्क न लावणार्‍या नागरीकांवर निगरानी पथकाने दंडात्मक कारवाई करुन १२०० रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.तसेच१६ एप्रिलला सुद्धा अशीच मोहीम राबवून सकाळी ८ वाजता पासुन १२ वाजे पर्यंत मॉस्क न लावणे व विनाकारण दुचाकी वरून फिरनार्याना ठानेदार रवी राठोड व पोलिस कर्मचारी तसेच गृहरक्षक दला कडुन हि कारवाई करण्यात आली व १२००० हजार रुपयाचा महसूल जमा करण्यात आला. लाॅकडाऊन झाल्यापासुन गावांतील नागरीकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार सुचना देण्यात आल्या तर प्रशासनाच्या वतीने आदेशही काढण्यात आले. मात्र गावातील युवकासह काहि नागरीक या आदेशाला केराची टोपली दाखवित आहे.येथील नागरीकांचे विनाकामाचे फिरणे, मास्क न लावणे, चाैका चाैकात घोळक्याने गप्पा मारत बसणे हा प्रकार सुरु असल्याने उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार आष्टी यांनी तयार केलेल्या निगरानी पथकांनी दि. १५ एप्रिल ला मास्क न वापरल्यामुळे प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात येवुन वसुल करण्यात आला हि कारवाई तहसीलदार आशिष वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली तलाठी किसन काैरती, अजय वानखडे, अनिल नागपुरे, मंगेश टेकाडे, पोलीस शिपाई भोयर आदींनी केली.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख

9890777242 / 9834453404