Home बुलडाणा
206

चिखलीत तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’

13 एप्रिल पासून पुढील तीन दिवस दूध विक्रीसह सर्वच प्रकारची दुकाने राहणार बंद

केवळ औषधी व दवाखान्यांना मुभा

प्रा , तंजीम हुसेन

चिखली जिला बुलडाणा : कोरानोचे ‘हॉटस्पाट’ ठरलेल्या चिखली शहरात विषाणूचा समूह संसर्ग टाळण्यासाठी 13 एप्रिलच्या दुपारी 12 वाजेपासून पुढील तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत यापूर्वी सकाळी 8 ते 12 पर्यंत सुरू राहणारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला आणि दुध विक्रीसुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश पालीका प्रशासनाने दिले असून केवळ मेडीकल व दवाखान्यांची सेवा यादरम्यान सुरू राहणार आहे. होम डिलिव्हरी साठी दुकानदारांना पासेस पालिकेतर्फे देण्यात आलेले आहेत
चिखली शहरात कोराना बाधीत तीन रूग्ण आढळून आल्याने समुह संसर्ग टाळण्यासाठी पालीका प्रशासनाने खबरदारीचे अनेक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. दरम्यान मुख्याधिकारी वायकोस यांनी यापूर्वी शहरात आवश्यक त्या उपाययोजनांसह ‘मास्क’ वापरणो सक्तीचे केले होते. मात्र, शहरात संचारबंदी लागू असतानाही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 8 ते 12 या वेळात नागरीकांकडून भाजीपाला, किराणा आदी वस्तूंच्या खरेदीसाठी उडणारी झुंबड, सोशल डिस्टंसींगची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर समुह संसर्ग टाळण्यासाठी मुख्याधिकारी वायकोस यांनी शहरातच्या हितासाठी कठोर पावले उचलली असून शहरात 13 एप्रिल पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 16 एप्रिल पर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ जाहीर केले आहे. यासंदर्भाने पालीक प्रशासनाने अधिसूचना जारी केली नसली तरी सोशल मिडीयाव्दारे संदेश तसेच शहरात पालीकेच्या वाहनाव्दारे नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊन अंतर्गत शहरातील भाजीपाला, फळे, किराणा आणि दुध विक्री आदी जीवनावश्यक वस्तूंची सर्वच दुकाने पूर्णत: बंद राहणार आहेत. केवळ वैद्यकीय सेवा व मेडीकल स्टोअर्सला या काळात सेवा सुरू ठेवण्याची मुभा राहणार आहे.

शहराला पोलीस छावणीचे रूप
शहरातील तीन कोरोना बाधीत रूग्णांच्या घरापासून तीन किलोमीटरचा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन पालीका प्रशासनाने केले आहे. यापृष्ठभूमीवर ठाणोदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शहरात तगडा पोलीस बंदोबस्त शिक्षकांना सोबत घेऊन ठेवण्यात आला आहे.

कोट.
कोरोनाबाधीत रूग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन शहर पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन दिवसात केवळ वैद्यकीय सेवा व औषधी दुकाने सुरु राहणार आहेत. शहरात समुह संसर्गा धोका उद्भवल्याने हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचा सर्वानी आदर करावा व समाज, शहर आणि देशहीतासाठी कोणीही घराबाहेर पडू नये. होम डिलिव्हरी साठी संबंधितांना पासेस देण्यात आलेल्या आहे
अभिजित वायकोस
मुख्याधिकारी, नगर परिषद चिखली
……………
Hide quoted text

———- Forwarded message ———
From: Pawan Laddha Date: Mon, 13 Apr, 2020, 6:34 PM
Subject: चिखलीत तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’
To: Tb Buldhana

चिखलीत तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’

13 एप्रिल पासून पुढील तीन दिवस दूध विक्रीसह सर्वच प्रकारची दुकाने राहणार बंद : केवळ औषधी व दवाखान्यांना मुभा

चिखली : कोरानोचे ‘हॉटस्पाट’ ठरलेल्या चिखली शहरात विषाणूचा समूह संसर्ग टाळण्यासाठी 13 एप्रिलच्या दुपारी 12 वाजेपासून पुढील तीन दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत यापूर्वी सकाळी 8 ते 12 पर्यंत सुरू राहणारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला आणि दुध विक्रीसुध्दा बंद ठेवण्याचे निर्देश पालीका प्रशासनाने दिले असून केवळ मेडीकल व दवाखान्यांची सेवा यादरम्यान सुरू राहणार आहे. होम डिलिव्हरी साठी दुकानदारांना पासेस पालिकेतर्फे देण्यात आलेले आहेत