Home विदर्भ घाटंजी तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत..!

घाटंजी तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत..!

183

🔵 अध्यक्षपदी महेंद्र देवतळे, तर सचिवपदी राजेश चव्हाण यांची अविरोध निवड ..!

घाटंजी : घाटंजी तालुका पत्रकार संघाची बैठक घाटंजी येथील विश्राम गृहावर दैनिक लोकशाही वार्ताचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या वेळी विशेष निमंत्रित म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विठ्ठलराव कांबळे, अंकुर साप्ताहिकाचे संपादक बाळासाहेब ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महेंद्र देवतळे (विदर्भ कल्याण), उपाध्यक्षपदी दिनेश गाउत्रे (सुपर भारत), सचिवपदी राजेश चव्हाण (हिंदुस्थान), कोषाध्यक्षपदी आकाश बुर्रेवार (तरुण भारत) व सहसचिवपदी सुधाकर अक्कलवार (लोकमत) आदींची अविरोध निवड करण्यात आली. सदरची कार्यकारणी तीन वर्षासाठी राहील, असे या वेळी घोषीत करण्यात आले.

या प्रसंगी घाटंजी तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र देवतळे म्हणाले की, माझी घांटजी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याने आता माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा माझा प्रयत्न असून पत्रकारांसाठी पत्रकार भवन मंजूर करणे माझे ध्येय असुन आपण पत्रकार भवनासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. पत्रकारांवर झालेल्या अन्यायाबाबत सुद्धा आपण शासन स्तरावर पत्र व्यवहार करुन पत्रकार संघ अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आज झालेल्या घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत घाटंजी तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी अयनुद्दीन सोलंकी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ठाकरे आदींचे समयोचित भाषने झाली.

या वेळी विशेष निमंत्रित व मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमतचे घाटंजी तालुका प्रतिनिधी विठ्ठलराव कांबळे, ज्येष्ठ पत्रकार तथा लोकशाही वार्ताचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत ढवळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ठाकरे आदींचा समावेश करण्यात आला.

घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत अयनुद्दीन सोलंकी (पुण्यनगरी), अरुण कांबळे (नमो महाराष्ट्र), सागर सम्मनवार (सकाळ), चंद्रमणी कवाडे (हिंदुस्थान), संतोष पोटपिल्लेवार (लोकदुत), पांडुरंग निवल (यवतमाळ डंका), प्रदीप वाकपैजन (नागपूर पोस्ट), मुकेश चिव्हाणे (सकाळ), प्रेमदास चव्हाण (जनसंग्राम), योगेश ढवळे (सिंहझेप), असलम कुरैशी (नवभारत), सैय्यद जावेद (लोकशाही वार्ता), विलास महल्ले (पब्लिक अँप) अमोल मोतेलवार (महासागर), कुणाल तांगडे, रमेश मादस्तवार (लोकशाही वार्ता) दिपक अग्रवाल ( नवभारत) रोशन अक्कलवार (जनमाध्यम), प्रमोद पाटील (टिसीएन न्युज) आदीं पत्रकार व बातमीदार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन महेंद्र देवतळे यांनी केले, तर आभार आकाश बुर्रेवार यांनी मानले. या वेळी घाटंजी तालुक्यातील अनेक पत्रकार वा बातमीदार आवर्जुन उपस्थित होते.