Home जळगाव मुक्ताईनगर शहरातील गट नंबर 373/1 मध्ये प्रस्तावित बिनशेती(एन ए)थांबून येथे मुस्लिम कब्रस्तान...

मुक्ताईनगर शहरातील गट नंबर 373/1 मध्ये प्रस्तावित बिनशेती(एन ए)थांबून येथे मुस्लिम कब्रस्तान करिता आरक्षित करण्यात यावी; मुस्लीम समाजाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी…

134

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील गट नंबर 373/1 मध्ये प्रस्तावित बिनशेती(एन ए)थांबून येथे मुस्लिम कब्रस्तान करिता आरक्षित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली,सविस्तर वृत असे की मुक्ताईनगर शहरातील मुस्लिम बांधवांना ची लोकसंख्या 10000(दहा हजार)झालेली आहे.आणि मुक्ताईनगर गावाचे तीन टप्प्यात पुनवर्सन झालेले आहेत.त्यात फक्त पहिल्या टप्प्यात 20 आर जागा ही मुस्लिम कब्रस्तान साठी देण्यात आलेली आहे.त्याच प्रकारे दुसरी जागा सुद्धा कब्रस्तान करिता देण्यात आलेली आहे.परंतु त्यावर चाळीस ते पन्नास वर्षापासून हिंदू बांधवांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेले आहे.ते काढणे शक्य नाही कारण ती जागा हिंदू लोकांच्या रहिवास शेजारी आहे.त्याचप्रमाणे सदर जागा लहान(कमी) असल्यामुळे आज रोजी कोणी जर मृत्यू पावला तर सर्व समाजासमोर एकाच प्रश्न निर्माण होतो की आता हे प्रेत कुठे दफन करावे.म्हणून कब्रस्तान ला लागूनच गट नंबर 373/1 सदर गट नंबर हा मुस्लिम कब्रस्तान(दफनभूमी) करिता आरक्षित करण्यात यावा.या साठी अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसैन खान(अमीर साहब)यांनी सुध्दा शासनस्तरावर मुस्लीम कब्रस्तान(दफनभुमी) साठी सदर गटाची मागणी केली होती.तसेच मुक्ताईनगर येथील आशयाचे पत्र सहा नगरसेवकांनी नगरपंचायत कार्यालयात दिलेली आहे.त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.त्याचप्रमाणे मुक्ताईनगर नगरपंचायत ला दिनांक 02-12-2020 रोजी नगरसेवक संतोष सुपडु मराठे यांनी लेखी पत्र दिले आहे.तसेच मुस्लीम बांधवांनी दोन महिन्या अगोदर सदर गटाला एन.ए.(बिनशेती) परवानगी देवु नये असे अर्ज सादर केलेले होते. तरीसुद्धा नगरपंचायत ने त्या गटाला तात्पुरती परवानगी दिलेली आहे.व सदर निवेदन मध्ये म्हटले आहे की,मा.जिल्हाधिकारी साहेब आपण मुक्ताईनगर येथील मुस्लिम समाजाची लोकसंख्या विचारात घ्यावी व भविष्यात प्रेत दफन करण्यासाठी जागाच शिल्लक नाही तर प्रेतांची विटंबना होऊन सदर समाजात संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तरी अल्पसंख्यांक समाजाचा विचार करून व भविष्याचा विचार करून सदर गट हा अत्यंत सोयीचा व मुस्लिम कब्रस्तान ला लागुन व मुस्लीम वस्तीत लागून असल्यामुळे या गटाला अंतिम एन.ए.(बिनशेती) परवानगी न देता येथे मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान साठी शासन स्तरावर कार्यवाही होऊन ही जागा मुस्लिम कब्रस्तान साठी आरक्षित करण्यात यावी अशी मागणी मा.जिल्हाधिकारी याच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.सदर निवेदन वर कब्रस्तान संघर्ष समिती चे अध्यक्ष शेख शकुर शेख शफी जमादार,सुन्नी मनियार मस्जिद चे अध्यक्ष शेख कलीम शेख हाजी रसुल मनियार, सलीम खान सईद खान,शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान,मनियार बिरादरीचे तालुका अध्यक्ष हकीम आर.चौधरी,काँग्रेस चे जिल्हा सचिव आसिफ खान इस्माईल खान,मुक्ताईनगर शाह बिरादरी चे अध्यक्ष जाफर अली नजीर अली,नवाब कींग फाउंडेशन चे अध्यक्ष अरबाज खान,शेख शकील शेख मुसा,शेख.भिकन,शब्बर शेख शब्बीर, साबीर पटेल,शेख आसीफ उस्मान,शेख.रफिक ताज मोहम्मद,सै.शरीफ,मुख्तार खान,अशफाक अली,शेख मजीद बागवान यांच्यासह निवेदन वर हजारो लोकांचे सह्या होते.