Home जळगाव जळगावात सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे जूता मारो पोस्टर फाडो आंदोलन…

जळगावात सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे जूता मारो पोस्टर फाडो आंदोलन…

178
0

 

जळगावात सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे जूता मारो पोस्टर फाडो आंदोलन…

रावेर (शरीफ शेख)
आपला भारत देश हा साधुसंतांचा देश असून इथली अखंडता, एकता आणि गंगा – जमनी तहजीब ( राष्ट्रीय एकात्मता) चे उदाहरण जगभरात दिले जाते. सरकार गरीब नवाज(रहे. ) हे भारतातील सर्व सुफी संतांचे प्रमुख व महान धर्मगुरू आहेत. भारतातच नाही तर संपूर्ण जगात गरीब नवाज यांना मानणारे भक्त आहेत. अजमेर येथील गरीब नवाज यांची दर्गाह गंगा जमनी तहजीब चे मुख्य केंद्र आहे. अजमेर येथे सर्व जाती धर्म व पंथांचे लोक अत्यंत आदर, सन्मान व भक्तिभावाने दर्गाह वर येऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून जातात.
अशा महान संतांविषयी एका वाईट व्यक्तीने समाज माध्यमावर एक विवादित व्हिडिओ बनवून प्रसारित केले असून सदर व्हिडिओ आहे पुष्कर सरोवर घाट, राजस्थान येथे बनविलेले असून त्यात त्या व्यक्तीने गरीब नवाज यांना शिवीगाळ करून आतंकवादी म्हटलेले आहे. याबरोबरच घरी नवाज यांच्या भक्तगणांना अजमेर येथे कोणी जाऊ नये व चादर फुल अर्पण करू नये असे आवाहन केले आहे. सदर व्यक्तीची टिपणी हे जाणीवपूर्वक षड्यंत्र रचून धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेली आहे.
म्हणून आज दि 5/1/21 मंगळवारी जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी यात सामील व्यक्तींच्या निषेध करण्यासाठी व त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकार्यालयावर जोडे मारो पोस्टर फोटो आंदोलन करून सदर व्यक्तीच्या छायाचित्राला जोडे मारून छायाचित्र फाडण्यात आले. तसेच याप्रसंगी ” एक आवाज बुलंद आवाज गरीब नवाज गरीब नवाज, मेरा ख्वाजा हिंद का राजा, मुर्दाबाद मुर्दाबाद ख्वाजा का गुस्ताख मुर्दाबाद, फासी दो फासी दो ख्वाजा के गुस्ताख को फासी दो, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मा जिल्हाधिकारी सो. जळगाव यांच्याद्वारे महामहिम मुख्यमंत्री सो राजस्थान यांना निवेदन पाठवून त्यात या आरोपींना कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, शेख शफी, शेख नाझिम, शेख सलीम उद्दीन, शफीक अहमद, इलियास नूरी, नाझीम कुरेशी, शेख अब्दुल जुम्मन, इ. उपस्थित होते.