Home जळगाव पत्रकार दिनी कमलाकर माळी यांचा औरंगाबाद मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव..

पत्रकार दिनी कमलाकर माळी यांचा औरंगाबाद मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव..

209

हमीद तडवी

आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी व पत्रकार दिनाच्या निमित्ताने रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. यांचा औरंगाबाद संभाजीनगर येथे युवाशक्ती पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता म्हणुन शाल. फुल गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.हा कार्यक्रम लोटाकारंजा रोडवरील अँपेक्स काँलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर काँग्रेसचे जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, माजी नगरसेवक मोहसीन अहेमद, संपादक मुशाहेद सिद्दीकी, सय्यद साबेर, समाजसेवक सुमीत पंडीत, पत्रकार अजहरोद्दीन, साजिद पठाण, संपादक सय्यद मोईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक युवाशक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शेख मुक्तार यांनी सुत्रसंचालन केले.आतापर्यंत कमलाकर माळी यांनी गावात मोफत मोतीबिंदू शिबीर. ग्राम स्वच्छता अभियान. वृक्षारोपण तसेच स्वखर्चाने गावाच्या नावाचा फलक.व व्हाँटसप ग्रुपच्या माध्यमातून प्रश्न मंजुषा असे नवीन नवीन उपक्रम राबवले आहेत व पत्रकारितेच्या माध्यमातून ते औरंगाबाद येथील माणुसकी समुहाशी जोडले गेले असुन ते ग्रुपच्या माध्यमातून समाजकार्य करत आहेत.त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम तसेच जावेद खान, योगेश साबळे, हफीज अली, प्रविण बुरांडे, हसन शाह, तौफीक शहेबाज,इरबाज अन्सारी, अखिल सर, मुशाहेद सिद्दीकी, शेख इसाकोद्दीन, साजिद पटेल, अलीम बेग, अनिस रामपुरे, संजय हिंगोलीकर, शकील अहेमद, मेराज खान, सय्यद शब्बीर शफी मिर्झा, शेख शफीक, असद खान आदी उपस्थित होते
त्यांनी पत्रकारितेमध्ये युवा वर्गांमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.