Home विदर्भ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती अमरावती विभाग कार्यशाळा व नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांच्या सन्मान...

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती अमरावती विभाग कार्यशाळा व नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांच्या सन्मान सोहळा संपन्न

302

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

अमरावती विभाग पोलीस मित्र परिवार समन्वय समिती अमरावती व जिल्हातील संपुर्ण तालुक्यातील नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांची कार्यशाळा व सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे, उद् घाटक किशोरनंदजी देशमुख माजी सहा.आयुक्त,अध्यक्ष प्राधिकरण महा.राज्य,संचालक bkd सतर्क न्यूज़ चॅनेल,प्रमुख पाहुणे राजेन्द्र चिंचलमलातपुरे,उप संपादक साप्ता.अमरावती संदेश,सचिन पाटिल माजी सभापती धामणगाव रेल्वे,अद्वैत चव्हाण अध्यक्ष असोशिएशन आॅफ डिजीटल सायबर लाॅ कन्सलंट, मनिष गुडधे अमरावती जिल्हा विभागिय प्रमुख,सुमनताई काळबेंडे महिला अमरावती जिल्हा अध्यक्ष,अॅड.मोहन किल्लेकर अमरावती जिल्हा विधी सल्लागार,याच्या प्रमुख उपस्थितीत दि.१३/९/२० ला आनंद पॅलेश हाॅल,जिल्हा उद्योग केंद्रासमोर अमरावती येथे पो.मि.प.स.समितीच्या सर्व ५९ नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांना ओळखपत्र,नियुक्तीपत्र,व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांनच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.पाहुण्यांनी सर्व प्रथम शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन संविधानेच्या प्रस्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले,पोलीस विभाग व सर्व सामान्य नागरिक यांच्या न्याय हक्कासाठी समिती संपुर्ण महाराष्ट्र भर कार्यरत आहे, आपण समितीचे ध्येयधोरण, स्त्री-पुरुष समानता सविधानाचे सम्मानार्थ कार्य करावे असे नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले,किशोरनंदजी देशमुख साहेब यांनी या कार्यक्रमास बसण्याकरिता हाॅल उपलब्ध करुन दिला याबाद्दल समितीचे अध्यक्ष यांनी त्याचे याप्रसंगी विशेष आभार व्यक्त केले.या कार्यशाळेसाठी दर्यापुर,तिवसा,नांदगाव खंडेश्र्वर,चांदुर रेल्वे,धामणगाव रेल्वे , अळणगाव , अचलपुर , कळमजातपुर , भिलटेक , धनोरा म्हाली , निंभा , येवदा,कवठा कडु,या विभागातील महिला व पुरुष पदधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थितीती दर्शविली,कार्यक्रमाचे प्रस्तावित कमलेद्र साखरे पो. मि. प. स. स. अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष,यांनी सुत्रसंचालन गजभिये मॅडम यांनी केले,कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन गजाननजी ईटनारे अमरावती जिल्ह उपाध्यक्ष यांनी केले. कैलाशजी विंचुरकर अमरावती जिल्हा अध्यक्ष,राजेन्द्रजी तांबेकर अमरावती जिल्हा सचिव,हंनुमंतजी मेश्राम चांदुर रेल्वे विभागिय तालुका प्रमुख,बाबारावजी इंगोले धामणगाव रेल्वे विभागिय प्रमुख,निखिल वाहणे चांदुर रेल्वे सचिव,प्रशांत नाईक धामणगाव रेल्वे प्रशिध्दी प्रमुख, विशाल चांवडे,हेमंत पाठक,देवराज मानेकर,अतुल पुनवटकर धामणगाव रेल्वे कोषाध्यक्ष व अमरावती जिल्हा व जिल्हातील संपुर्ण पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पदधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य व मदत केली.