Home बुलडाणा रेशनच्या तांदूळ व्यावसायिकांच्या घशात..!

रेशनच्या तांदूळ व्यावसायिकांच्या घशात..!

190

तालुक्यात तांदूळ खरेदी करणारे रॅकेट सक्रिय..!

गरिबांच्या रेशनवर व्यावसायिकांची नजर..!

रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:- भुसार व्यावसायिक आणि किरकोळ दुकानदार व काही व्यक्ती गावा मध्ये गल्लो गल्ली फिरतात .तांदळाची खरेदी करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मोफत मिळालेल्या रेशनच्या तांदळाची 10-12 रुपये किलोने सर्रास विक्री होत आहे.रेशनच्या कार्डवरील प्रति व्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ देण्यात आला मार्च -एप्रिल व मे या तीन महिन्यांच्या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या तांदळाचा साठा लाभार्थ्यांकडे जमा झाला आहे. अशातच कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या हाताला काम नसल्याने गरीब लाभार्थ्यांकडे जमा झालेल्या तांदुळाची खरेदी करणारे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. गरिब व रेशनकार्ड लाभार्थ्यांना पैशांचे अमिष दाखवून तांदळाची खरेदी केली जात आहे.काही विक्रेते हा तांदूळ खरेदी करतात व त्यांच्याकडे आलेला तांदूळ पुन्हा मोठे व्यापारी खरेदी करतात. अन्न पुरवठा विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे यवडे मात्र खरे….!