Home जळगाव रावेर येथे १२२५ नागरिकांची तपासणी ७३५० लोकांचे सर्वेक्षण

रावेर येथे १२२५ नागरिकांची तपासणी ७३५० लोकांचे सर्वेक्षण

239

डॉ सुयोग चौधरी , जळगांव यांची कॅम्प मध्ये तपासणी…

रावेर (शरीफ शेख)

रावेर शहरात मध्यवर्ती नगर पालिका ,शादी हाल येथे जळगाव केअर युनिट व रावेर मुस्लिम मुततेहदा कौन्सिल मार्फत सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यात ७३५० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्या पैकी १२२५ लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आला.
उद्घाटन समारंभ
कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन रावेर-यावल मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. त्या वेळी व्यासपिठावर लोक नियुक्त
नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद,प्रांत डॉ अजित थोरबोले, तहसीलदार उषा राणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,केअर युनिट चे अध्यक्ष गफ्फार मलिक,फारूक शेख सह नगर सेवक आसिफ मोहम्मद,अय्युब खान ,शेख कलीम ,असद खान , मुफ्ती अतिकुर रहमान , शफी सर,सलीम सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक शेख व आभार समनव्यक फिरोज खान यांनी मानले.

शिरीष दादा यांचे मार्गदर्शन

शासनास खरी गरज आहे ती गरज ओळखून कोविड केअर युनिट चे कार्य चालू असून कौटुंबिक सर्वेक्षण करून त्यातील रुग्णाला तपासून मोफत औशोधोपचार दिला जात आहे व लोकांच्या मनातील भीती दूर करीत आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले

प्रशासना तर्फे रामदास वाकोडे , पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन
नागरिकांनी आपली सुरक्षा स्वतः करावी ,मास्क लावून सामाजिक अंतर ठेवावे व कोविड केअर युनिट सारखे कॅम्प आयोजन करावे असे आव्हान केले.

अध्यक्षीय अब्दुल गफ्फार मलिक यांचे मार्गदर्शन
भारत देश हा सर्व जाती धर्माचे असून आजार हा जात,पात बघून येत नाही परंतु काही लोक यांच्यात सुद्धा राजकीय रंग देऊन जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला परंतु शिरीष दादा, अजित थोरबोले यांच्या सारखे बांधव आहे तो पर्यंत या भारतात जातीय वाद वाढणार नाही असे भावनिक आव्हान केले.
डॉ सुयोग चौधरी मुख्य आकर्षण
जळगाव येथील फिजिशियन एम डी मेडिसिन डॉ सुयोग चौधरी यांनी सुद्धा वैद्यकिय शिबिरात सहभाग घेऊन पूर्ण एक तास तपासणी केली त्यांच्या टेबलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती.
समारोपीय कार्यक्रम

रावेर व मारुळ येथील डॉक्टरांनी शिबिरात सहभाग नोंदविला व कोरोना च्या युद्धात सहकार्य केले म्हणून त्यांचा सुध्दा प्रमाण पत्र देऊन आमदार शिरीष दादा चौधरी,मुफ्ती अतिकुर रहेमान व गफ्फार मलिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.

रावेर येथे महिला ६ डॉक्टर सह २१ डॉक्टरांची सेवा

डॉ.शरीफ शाह,डॉ.जावेद,डॉ. अब्दुल रहीम, डॉ. वसी अहमद, डॉ.वकार,डॉ.तौसिफ शेख, डॉ.रियाज़ बागबान, डॉ.फिरोज खान,डॉ.अब्दुल वहाब, डॉ.महजबीन सैय्यद, डॉ.निलोफर,डॉ.आफरीन शेख मुख्तार,डॉ.सायमा असलम खान, डॉ. निशाहत अब्दुल वहाब,( सर्व जळगांव)
डॉ. सैय्यद मोहम्मद हनिफ़ ,डॉ. शाहिद सैय्यद, डॉ.मोहम्मद अवसाफ़,डॉ.रमीज़ इक़बाल,( सर्व मारुळ)
डॉ. इरफान शेख, डॉ. यास्मीन खान,डॉ. हबीब मालिक,डॉ. वसीम शेख(सर्व रावेर)
*रावेर येथील कार्यकर्ते*
ऐजाज अहमद,रहमान मलिक,सैय्यद अफसर,सैय्यद ज़ाकिर,दानिश खान,मोइन सर,शैख़ सलीम ,फिरोज एम पी जे, शोएब खान,निजामुद्दीन, फिरोज खान, सलीम शेख, नासिर अहमद, शेख मोईन,सैयद अफसर यांनी प्रयत्न केले.
*जळगाव येथील योद्धे कार्यकर्ते*
अजहर हुसैन,अरशद खान,इब्राहीम हैफिज़
आमिर शेख, अनिस शाह,जुलकर नैन,आबिद हारून,अतिक शेख, रफिक मानियार, सलीम इमाम,सादिक सर,अय्युब सर, मुश्ताक सर,कालु शेख नुरा, सैयद अनिस,अरफात मसूद,यांनी कार्य केले.