Home मराठवाडा गेवराई येथे सहा जणांचा अहवाल पाझेटिव्ह अलगीकरन विभागात सुविधांचा अभाव प्रशासनाचे दुर्लक्ष...

गेवराई येथे सहा जणांचा अहवाल पाझेटिव्ह अलगीकरन विभागात सुविधांचा अभाव प्रशासनाचे दुर्लक्ष ,

103

अँड , ताज अहमद अन्सारी ,

गेवराई/प्रतिनिधी

कोरोना रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे,अलगिकरण केंद्रात सौचालयाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने एकाच सौचालयाचा वापर होत असून 10 जुलै रोजी शहरातील विविध भागातील 6 जणांचा अहवाल कोरोना पोजिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका इसमास कोरोना रोगाची लागण झाल्यानंतर सहवासात आलेल्या काही लोकांना 5 जुलै रोजी शहरातील एका अलगिकरण केंद्रात दाखल करण्यात आले व शहरातील इस्लामपुरा,मोमीनपुरा,संजयनगर आदी भाग सील करण्यात आला मात्र अलगिकरण केंद्रात दाखल करण्यात आलेल्या लोकांना कोणत्याच स्वतंत्र सुविधा नसल्याने एकाच सौचालयाचा वापर केला जात असून नगर पालिका प्रशासनास केंद्रातील रुग्णांनी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी करून देखील दृलक्ष केले जात आहे
अलगिकरण केंद्रात इस्लामपुरा भागातील दाखल करण्यात आलेल्या लोकांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता 11जुलै रोजी पहाटे अहवाल प्राप्त झाला असून 4 लोकांचा अहवाल पोजिटिव्ह आला तर इतर दोघांचा अहवाल देखील पोजिटिव्ह आला असून सहा जणांचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने गेवराई शहरात खळबळ माजली आहे एकंदरीत नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेवराई शहरात कोरोना रोगाचा फैलाव होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे एकीकडे नागरिकांना प्रशासन अंतर राखण्याचे,मास्क वापरण्याचे सूचना देत असताना दुसरीकडे शासनाने निर्मित केलेल्या अलगिकरण केंद्रातच नियमांचे पालन न करता एकाच सौचालयाचा वापर सर्वांसाठी केला जात आहे