Home सोलापुर वागदरी येथील रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद , १०० रक्तदात्यानी केले रक्तदान.

वागदरी येथील रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद , १०० रक्तदात्यानी केले रक्तदान.

192

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – कोरोना विषाणूचा महामारीमुळे लॉकडाउन सारख्या बिकट परिस्थितीत अनेक रूग्णाना रक्ताची गरज भासते. अशा वेळी वागदरी येथील जागृती फौडेंशन व तरूण मित्र मंडळानी रक्तदान शिबीर भरवुन संकटकाळी मदतीचे हात पुढे केले, खरोखरच अनुकरणीय व स्तुत्य कार्य असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशट्टी यांनी केले.

वागदरी येथील जागृती फौडेंशन व तरूण मित्र परिवाराच्या वतीने शिवलिंगेश्वर मंगल कार्यालयात परमेश्वर सावंत यांनी रक्तदान करून कार्यक्रमास सुरूवात झाली. या वेळी माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे, महात्मा गांधी गाव तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव, ग्रा प सदस्य सुनिल सावंत, उमेश पोमाजी, दत्ता मंगाणे, मंजुनाथ पोमाजी, महादेव पोमाजी, महादेव सोनकावडे, अमर ठोंबरे बळीराम पोमाजी, विनोद घुगरे, प्रशांत मठपती, लक्ष्मीपुत्र यमाजी, शांतु कोठे, श्रीशैल ठोंबरे, प्रदिप पाटील, शिवराज पोमाजी, कमलाकर सोनकांबळे, संतोष पोमाजी , आकाश होनकोरे, प्रकाश पोमाजी, आदी उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना आ. कल्याणशट्टी म्हणाले की,
सध्या देशात अनेक गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत रक्त पुरवणे हे आपले परम कर्तव्य आहे. सर्वांनी मिळून रक्तदान करू या आणि राष्ट्रीय कामात आपले हातभार लावुन, रक्ताचा अनुशेष भरून काढण्याचे आवाहन केले .
यावेळी एकुण १०० रक्तदात्यानी रक्तदान केले. या वेळी नागिनी गणेश शिंदे या एकमेव महिलानी रक्तदान करून आदर्श निर्माण केल्यामुळे आ. कल्याणशट्टी यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महादेव पोमाजी यांनी रक्तदान केलेल्या रक्तदात्याचे स्वागत व आभार मानले.