Home जळगाव पाचोर्यात जनता कर्फ्यू च्या नावाखाली न. पा. कर्मचारींची दहशत कशासाठी??

पाचोर्यात जनता कर्फ्यू च्या नावाखाली न. पा. कर्मचारींची दहशत कशासाठी??

451

निखिल मोर

पाचोरा – शहरातील जनता कर्फ्यू ची घोषणा झाल्यानंतर जनतेने ठरवायचे असते तर तो अधिकारी कोण ज्याने व्यापारी वर्गाला बंद करण्यास भाग पाडले आहे असा सवाल कॉग्रेस चे सचिन सोमवंशी यांनी विचारला आहे.

शहरातील तिन दिवस जनता कर्फ्यू ची घोषणा करण्यात आली तर ज्यांनी घोषणा केली त्यांनीच पुन्हा हा जनता कर्फ्यू असुन व्यापारी आणि जनतेने ठरवायचे दुकाने चालु करायचे की नाही एकीकडे असे बोलणारे आ. किशोरअप्पा पाटील तर दुसरीकडे त्यांचीच सत्ता नगर परिषद मध्ये असल्याने न. पा. चा एक जबाबदार अधिकारी आणि काही कर्मचारी शहरात सकाळी फीरुन दुकाने बंद करत होते असे का झाले व्यापारी वर्गाला कळलेच नाही. मी आज ही सामान्य व्यापारी वर्गाला स्वखुशीने व्यवसाय सुरू ठेऊ द्या असे न. पा अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनंती करतो कारण गेल्या दोन अडीच महीन्या पासून शहरातील व्यापारी पुर्णपणे बर्बाद झाला असून ज्यांना दुकाने चालु करायचे त्यांना सक्ती करु नका असे सचिन सोमवंशी यांनी स्पष्ट करत कायदेशीर जनता कर्फ्यू नसल्याने व्यापारी वर्गाला दहशतीत बंद करण्यास भाग पाडु नये ज्या व्यापारी कुणी दम देत असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या कडे तक्रार करु शकतात. न. पा. प्रशासकीय अधिकारी श्री भोसले यांना संपर्क केला असता आमचा कोणत्याही अधिकारी व कर्मचारी हे शहरात फिरत नाही असे सांगितले तर मग तो अधिकारी कोण व ते कर्मचारी कोण ज्यांना घेऊन सकाळी काही दुकाने उघडत असतांना बंद करायला भाग पाडले याचीही उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी चौकशी करावी अशी मागणी श्री सोमवंशी यांनी करुन आ. किशोरअप्पा पाटील यांनी तातडीने न. पा. ची प्रेस नोट द्यावी की जनता कर्फ्यू हा सक्तीचा नाही आणि जो कुणी नगर परिषद चा अधिकारी व कर्मचारी सक्ती करत असेल तर तात्काळ कारवाई होईल असे नमूद करावे असे आवाहन शेवटी कॉग्रेस चे आरोग्य सेवा सेल प्रदेश सरचिटणीस तथा राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र प्रभारी सचिन सोमवंशी यांनी केली आहे.