Home विदर्भ अस्कारलेले तळेगाव शामजी पंत येथील आर एफ अो. – साथरोग कायद्याचा उडवला...

अस्कारलेले तळेगाव शामजी पंत येथील आर एफ अो. – साथरोग कायद्याचा उडवला फज्जा…!

258

वर्धा जिल्हा आष्टि तालुका आज संपूर्ण जगात व भारतात कोरोनाने हैदोस घातला असून महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा फैलाव खूपच जास्त प्रमाणात आहे. त्यातील काही जिल्हे रेड झोन’मध्ये असून वर्धा जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता शासनातर्फे वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती होत आहे. असे असतांना सुद्धा तळेगाव शामजी पंत येथील वनविभाग मात्र संवेदनशील दिसत नाही.

सविस्तर वृत्त असे की तळेगाव येथील वनविभागात वनरक्षक म्हणून दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती त्यातील अर्जुन डेहनकर रा. बदनापुर जिल्हा जालना व अजय नेवले रा. चांदुर रेल्वे. जिल्हा अमरावती या दोघांची नियुक्ती झाली होती व ते ट्रेनिंग वर असल्यामुळे व त्यातच पूर्ण महाराष्ट्र लोक डाऊन झाल्यामुळे ते आपल्या शहरात अडकून पडले होते. त्यातच ते शुक्रवार तारीख 17 ला तळेगावला आले. कशाने व कोणत्या वाहनाने आले हे मात्र कळू शकले नाही ते दोघेही ज्या जिल्ह्यातून आले ते दोन्ही जिल्हे कोरोणा पॉझिटिव्ह आहे. ते येथे आले याची साधी माहितीही वनविभागाचे अधिकारी पाटील साहेबांना माहिती नाही? ते एक दिवस हेड क्वॉर्टरला राहून दुसऱ्या दिवशी तळेगावातील शिक्षक कॉलनी मध्ये उच्चभ्रू कॉलनीतील एका सदन घरी किरायाने राहण्यास आले आणि त्यांना किरायाने रूम सुद्धा मिळाली तीही कुठलीही शहानिशा न करता पण ते आल्यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी करण्यात आली नाही आणि अशातच जर का ते पॉझिटिव निघाले तर याला जबाबदार कोण? ते किरायाने राहण्यास आले अशी माहिती जेव्हा गावातील नागरिकांना मिळाली तेव्हा त्यांनी याची माहिती तळेगावातील पत्रकार बांधवांना दिली त्या वेळी ही बाब उजेडात आली नाही तर ते कर्मचारी बिनधास्त वावरत राहिले असते. पहिले तर त्यांना आर एफ ओ साहेबांनीच कोरणटाइन करायला पाहिजे होते. दुसरे म्हणजे ज्या घरी ते किरायाने राहायला आले त्यांनी याची माहिती पोलीस स्टेशन किंवा आरोग्य विभागाला द्यायला हवी होती मात्र तसे कुठेही झाली नाही.आज सदर वनविभाग कार्यालय येथे पत्रकार संघाचे काही प्रतिनिधी माहिती घेण्यास गेले असता नियमांची ऐशीतैशी पहावयास मिळाली तेथील कर्मचारी हे मॉस्क न लावता वावरत असताना आढळले. एवढेच नाही तर साहेबांनी सुद्धा मास्क लावला नव्हता जर जबाबदार व्यक्ती जर नियम पाळत नसेल तर याला काय म्हणावे?आणि महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयाच्या बाहेर स्यानेटाईज करण्याकरिता कुठलीही प्रकारची व्यवस्था आढळून आली नाही. आता मात्र या गंभीर विषयाकडे वरिष्ठ कोणत्या नजरेने पाहतात व काय कारवाई करतात याकडे तळेगावातील नागरिक लक्ष देवून वाट पाहत आहे.
प्रतिक्रीया: सुहास पाटिल आर.एफ.ओ.तळेगांव परिक्षेत्र ते दोघे शुकवारी आले असे समजले.दोन दिवस सुटी आल्या मुले माहिती पडले नाही.आणी तुम्ही एवढे विचारणारे कोन.अशी उद्धट प्रतिक्रीया दिली. झालेल्या प्रकरणा बद्दल त्यांना काहीहि वाटत नाही व ते संवेदनशील दिसत नाही.

प्रतिनिधि
रविन्द्र साखरे सह ईकबाल शेख