Home राष्ट्रीय दिल्ली येथील कार्यक्रमात गेलेल्या नांदेडच्या त्या (जवळपास) १५ जणांन पैकी ८ जणांना...

दिल्ली येथील कार्यक्रमात गेलेल्या नांदेडच्या त्या (जवळपास) १५ जणांन पैकी ८ जणांना केले रूग्णालयात दाखल – पोलिसाधिक्षक विजयकुमार मगर

433
0

नांदेड, दि.१ : ( राजेश भांगे ) – दिल्लीतील निजामोद्दिन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातुन हजारो जन उपस्थित राहिल्याची माहिती समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली व यातील काहिजन कोरोना बधित असल्याचे समजताच सर्वच यंत्रणांची झोप उडाली.
मात्र नांदेड जिल्ह्यातील १५ जणांनी दिल्ली च्या निझामोद्दीन येथील कार्यक्रमात हजेरी लावल्याचे पुढे आल्याने नांदेड मधील आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासन हि सर्तक झाले असुन.

नांदेड मधील दिल्ली , निझामोद्दीन येथे गेलेल्या त्या १३ जणां पैकी आठ जणांची ओळख पटली असुन नांदेड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन रूग्णालयात केले व त्यांचे स्वॕब नमुने तपासणी साठी पाठविले असुन अजुन नमुने तपासणी चा अहवाल यायचा आहे. तरी तेरा जणांन पैकी आठ जण मिळाले असले तरी जे उरवरीत पाच जण आहेत त्या पैकी दोघे जण बाहेरील जिल्ह्याचे आहेत व ते हि मिळाले असुन त्या संबंधीत त्या जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांना कळविण्यात आले आहे कि त्यांचे स्वॕप नमुने तपासणी साठी पाठवावेत आणि राहिलेल्या तीन पैकी एकाचे सिम कार्ड दुसऱ्या च्या नावे असल्यामुळे त्याचा तपास सुरू असुन त्या दोन लोकांचे ट्रेसिंग आहे. व आम्हाला थोडिशी आणखी माहिती मिळाली असुन दिल्ली निजामोद्दीन च्या त्या कार्यक्रमात नांदेड मधुन जवळ जवळ पंधरा लोक गेल्याचे समजते. तरी अद्यापही युद्ध पातळीवर तपास मोहिम चालुच आहे व आम्ही शोध घेतच आहोत. तरी मा. पंतप्रधान आणि मा. मुख्यमंत्री अवाहन केल्या प्रमाणे कोणीही चुकिची अफवा पसरवु नये व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये तसेच विनाकारण घराबाहेर फिरणे घातक असुन आपण स्वतःला व आपल्या कुटुंबीयांना धोक्यात घालु नये असे अवाहन यावेळी नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक मा.विजय कुमार मगर यांनी केले.

Previous articleजिल्हा वार्षिक योजनेतून करोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी 11 कोटी 8 लाख रुपयांचा निधी वितरित धंनजय मुंडे ,
Next articleअकोटात आज पासुन मिळनार 5 रुपयात शिवभोजण थाळी कोरोनाचे आपात्कालीन स्थितीत गरजूंना सहारा
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here