Home जळगाव २०२० साठीचे “मूकनायक पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार” व मूकनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार...

२०२० साठीचे “मूकनायक पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार” व मूकनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार करिता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन

181

मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेचा उपक्रम

रावेर (शरीफ शेख)

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या “मूकनायक”वृत्तपत्राला शंभर वर्ष पूर्ण होत असून या शताब्दी वर्षानिमित्त शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, यांनी जाहीर केला आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई या संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर “मूकनायक शताब्दी वर्ष” साजरे करण्यत येत आहे.म्हणूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा व नजर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रातील सेवा व्रत असणाऱ्या व संपूर्ण जीवन पत्रकारितेसाठी समर्पित करणाऱ्या पत्रकार,संपादक यांना “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक जीवन गौरव पुरस्कार” देण्यात येणार आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पत्रकारितेत योगदानाबद्दल “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्कार” दिला जाणार आहे.
तरी या पुरस्कारकरिता जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांनी निवड समिती कडे प्रस्ताव पाठवावे.प्रस्ताव पाठवतांना त्यात पत्रकारितेला सुरवात केल्या पासून ते आज पर्यंतचे संपूर्ण अनुभवाचे सविस्तर नोंदी नमूद करावे, प्रत्येक वर्षाचे विविध वृत्त पत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कमीत कमी पाच कात्रणाचे झेरॉक्स सोबत जोडावे.जिल्ह्यातील पत्रकार बांधवाना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव दिनांक 15 मार्च 2020 पर्यंत पाठविण्याचे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणारे वार्ता संकलन, वार्ता लेखन, बातम्यांचे संपादन, विश्लेषण, बातम्यांवर टिकाटिपण्णी,शासनाचे धोरण, शासकीय योजना सामान्य जनते पर्यन्त पोहचविणे,जन सामान्यांवर झालेल्या अन्यायाला लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून देणे असे कामगिरी बजावून उत्कृष्ठ पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांची “मूकनायक पुरस्कार” करिता निवड करतांना या गोष्टी लक्षात घेतल्या जाणार आहेत.त्या नुसार पत्रकार यांनी प्रस्ताव तसा बनवून पाठवावा.पुरस्कार निवड करिता या पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची निवड समिती असणार असून समितीने केलेली निवड अंतिम राहील.असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर प्रस्ताव – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ए-विंग, ए-1 पाचवा माळा, गोलाणी मार्केट, जळगाव ता.जि.जळगाव या पत्यावर पाठवावे.संपर्क – 9021969100