(प्रतिनिधी लियाकत शाह)
मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, याचा सह विविध मागण्यांकडे धुळेचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी विधानसभेत लक्ष वेधले. यावेळी सर्वप्रथम आमदार फारुख शाह यांनी पॉवरलूम व्यावसायिकांसाठी देण्यात आलेल्या विधानसभेत वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारचे कौतुक केले. तसेच सन २०२०-२१च्या अर्थ संकल्पात अल्पसंख्याक समाजासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकासासासाठी अल्पसंख्याक विकास महामंडळ कार्यालय सुरु करण्यात यावे. मौलाना आझाद महामंडळाकडून बेरोजगार तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढविण्यात यावी. संपूर्ण महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या शाह यांची जमिनीवर “अतिक्रमण झालेच्या मागणी आहेत तर ती जागा सरकारने ताब्यात घेऊन ती वक्फ बोर्डाकडे सोपवावी. तसेच मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या आमदार डॉ. फारुख शाह यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केल्या.

