Home मराठवाडा घरातील फ्रिज, टीव्ही, फर्निचर उचलून नेणार; मुंबई महापालिकेचा कर बुडव्यांना दणका

घरातील फ्रिज, टीव्ही, फर्निचर उचलून नेणार; मुंबई महापालिकेचा कर बुडव्यांना दणका

95
0

नांदेड , दि. ७ ; ( राजेश भांगे ) –
मालमत्ता करात आधी सूट दिली, नंतर कर बुडव्यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवले तरीही काही लोक मालमत्ता कर भरण्यात टाळाटाळ करत असल्याने या कर बुडव्यांना अद्दल घडविण्यासाठी मुंबई महापालिकेने नवी शक्कल लढवली आहे. या कर बुडव्यांच्या घरातील दुचाकी, चारचाकी, फर्निचर, टीव्ही, एसी आणि फ्रिज जप्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
चालू आर्थिक वर्षात महापालिकेला मालमत्ता करापोटी ५ हजार ५०० कोटी मिळणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत केवळ ३ हजार १५४ कोटी एवढीच मालमत्ता कराची वसुली झाली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर वसुलीत तब्बल दोन हजार कोटी रुपयांची घट झाल्याने महापालिका प्रशासनाचा पारा चढला आहे. त्यामुळे महापालिकेने पहिल्यांदाच मालमत्ता कर बुडवणाऱ्यांच्या अचल संपत्तीबरोबरच चल संपत्तीवर देखील जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालमत्ता कर थकबाकीपोटी आता दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रीज आदी वस्तुंवर देखील कारवाई केली जाणार आहे. विलेपार्ले परिसरात मालमत्ता कर न भरल्याने कालच दोन हॅलिकॉप्टर जप्त करण्यात आले होते. त्यामुळे पालिकेने आता थेट कर बुडव्यांच्या घरातच शिरून घरातील वस्तू जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालमत्ता कर थकबाकीपोटी यापूर्वी ‘बृहन्मुंबई महापालिका अधिनियम १८८८’च्या कलम २०३ अन्वये जलजोडणी खंडीत करणे, मालमत्तेची अटकावणी करणे, मालमत्तेची जप्ती करणे यासारखी कारवाई करण्यात येत असे. मात्र, यंदा मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा फारच कमी प्रमाणात झाल्याने या कर वसुलीसाठी विविध स्तरीय प्रयत्न करण्यात येत आहेत, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

Previous articleबुलडाणा प्राइडला महसूल प्रशासनाने बजावला पाच पट दंड
Next articleराज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा अन्यथा एक लाख दंड भरा – राज्यशासन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here