बुलडाणा

बुलडाणा प्राइडला महसूल प्रशासनाने बजावला पाच पट दंड

Advertisements
Advertisements

97 लाख 53 हजार 480 रुपये दंड

अमीन शाह

बुलडाणा – सर्व नियम पायदळी तुडवून तसेच महसूल प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावून बांधण्यात येत असलेल्या बुलडाणा प्राईडला अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणे, तसेच शासनाची दिशाभूल करण्याच्या प्रकरणी तब्बल पाच पट दंड ठोठावण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम 97 लाख 53 हजार 480 रुपये बुलडाणा प्राईड संचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहिती नुसार बुलडाणा शहरातील तहसील कार्यालयासमोर व्यावसायिक आणि निवासी वापराकरिता भव्य अशी बुलडाणा प्राईडची इमारत उभी राहत आहे. मात्र ही इमारत उभी करताना याच्या बांधकाम ठेकेदारांनी सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. विशेष म्हणजे तहसील कार्यालयापासून ही इमारत अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र तहसील व नगरपालिका प्रशासन डोळे झाकून बसल्याचे दिसून येत आहे. ही इमारत ज्या जागेवर उभी आहे, ती जागा केवळ लीजवर दिली जाऊ शकते. ती मालकी हक्काने होत नाही. मात्र तरीही नियम मोडून या प्लाॅटचे दोन भाग करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी नियमापेक्षा जास्त प्रमाणात खोलवर उत्खनन करण्यात आले. त्यातून हजारो ब्रास गौण खनिज अवैधरित्या काढण्यात आले. त्याची राॅयल्टी देखील बांधकाम कंत्राटदाराने जमा केली नाही. तसेच या गौण खनिजाचे वहन करण्याची देखील परवानगी काढली नाही. मात्र तत्कालीन तहसीलदारांपासून आजपर्यंतच्या तहसीलदारांपर्यंत कोणीही या संदर्भात कारवाई केली नाही. दरम्यान, या प्रकरणी काही जागरुक नागरिक व पत्रकारांनी प्रशासनाकडे तक्रार करून पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्याबाबत प्रशासनाला जाग आली. मात्र तरीही तहसील प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी केवळ दुप्पट दंड आकारून थातूर-मातूर कारवाईचा देखावा केला. मात्र या संदर्भात सातत्याने प्रशासनाकडे तक्रारकर्त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे अखेर प्रशालनाला हार मानत या प्रकरणी बुलडाणा प्राईडच्या संचालकांवर तब्बल पाच पट दंड आकारण्याची कारवाई केली आहे. ही दंडाची रक्कम एक कोटी जवळपास झाली असून, या कारवाईमुळे बुलडाणा प्राईडच्या संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे बुलडाणा अर्बन प्राईडच्या बांधकामावर नगर प्रशासनाने पत्र क्र.सीओ/नपबु/2783/2018 दिनांक 14/12/2018 अन्वेय समनधितांना कळविण्यात आलेले व बंदी घातलेली आहे. मात्र आजही हे बांधकाम राजरोसपणे दिवसाढवळ्या प्रशासनासमोर सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही इमारतच पूर्णपणे अवैध असूनदेखील प्रचंड जाहिरातबाजी करून लोकांकडून येथे प्लाॅट आणि दुकाने खरेदी करण्यासाठी बुकिंग घेण्यात येत आहे. यातून ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकारामुळे महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि बुलडाणा प्राईडच्या संचालकांचे साटेलोटे असल्याचे उघड होत आहे. या अवैधरित्या होत असलेल्या बांधकामाला शहरातील काही बड्या आणि श्रीमंत धेंडांचा पाठिंबा असल्यामुळे प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र अवैधरित्या बांधकाम करण्यात येत असलेल्या या इमारतीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी तक्रारकर्त्यांकडून शिस्तबद्ध कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याकडे करण्यात आली असून तक्रारकर्ते बुलडाणा प्राईडवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सतत सुरू ठेवणार आहे. याशिवाय प्रशासनाकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात देखील प्रशासन कुचराई करीत असून, आतातरी या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल, का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...