Home जळगाव खान्देशच्या सुपुत्रांची पश्चिम महाराष्ट्रात चमकदार कामगिरी.

खान्देशच्या सुपुत्रांची पश्चिम महाराष्ट्रात चमकदार कामगिरी.

112
  • रावेर (शेख शरीफ)
    मुळचे खान्देशातील चुंचाळे तालुका यावल जिल्हा जळगाव येथील रहिवासी श्री हसन रुबाब तडवी हे सध्या सातारा जिल्हा पोलीस दलात पोलीस हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असून त्यांनी सातारा पोलीस दलात सातत्याने अतिशय चमकदार कामगिरी करून खान्देशचे नाव उज्वल केले आहे. सध्या ते शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेत (DB) नेमणुकीस असून त्यांनी आजपर्यंत मर्डर, राॕबरीसह अनेक किचकट गुन्ह्यांचा छडा लावून मोलाची कामगिरी करुन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. मोक्का, एमपीडीए, तडीपार प्रकरणे बनविण्यात ते माहीर असून त्यांनी त्याद्वारे भल्या भल्या गुन्हेगारांची दांडी गुल केली आहे. पोलिस दलात त्यांना मोक्का किंग म्हणुनही ओळखले जाते. त्यांनी प्रचंड मेहनत घेवुन गुन्हेगारी टोळीतील 27 गुन्हेगारांना मोक्का लावण्यात व तीन गुन्हेगारांवर एमपीडीए ची कारवाई तसेच जवळपास 49 गुन्हेगारांना जिल्ह्यातुन तडीपार करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकतेच मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी त्यांचे कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखा सातारा (LCB) येथे केली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी यांना आतापर्यंत 150 च्या वर बक्षीसे (रिवाॕर्ड) मिळाले असून त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक मा. पोलीस अधीक्षक सो सातारा यांनी करून त्यांना अनेक वेळा प्रशंसा पत्र देऊन गौरविण्यात आले आहे. खान्देश साठी ही अतिशय अभिमानाची बाब असून खान्देशातील या सुपुञाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात देखील अशाच प्रकारे कामगिरी उंचावण्याचा त्यांचा मानस असून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी पोलीस दलात अधिक जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हसन तडवी हे आपल्या पोलीस दलातील नोकरी बरोबरच सामाजिक जबाबदारीचे भान राखून समाजातील गरजू व्यक्तींना नेहमी मदत करत असतात. स्वभावाने शांत, कर्तव्याशी प्रामाणिक व जनतेशी आपुलकीची भावना जोपासल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मनात त्यांचेबद्दल आदराचे स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रात खान्देशचे नावलौकिक करणा-या या खान्देशच्या सुपुत्र ला मनापासुन सलाम.