Home महत्वाची बातमी यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी घेतला वाघाडीतील कामांचा आढावा

यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी घेतला वाघाडीतील कामांचा आढावा

51

पर्यावरणपुरक कामे पावसाळ्यापुर्वीच करण्याच्या सुचना…!

यवतमाळ (प्रतिनिधी) यवतमाळातील एतिहासीक वाघाडी नदीचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी संस्था, संघटना, पर्यावरणस्नेही व यवतमाळकरांतर्फे ४२ आठवड्यांपासुन स्वच्छ सुंदर वाघाडी अभियान राबवीण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त राज्यातील निवड झालेल्या नद्यांमध्ये वाघाडीचाही समावेश असुन जलजागृतीतुन जनजागृती हा नदीसाक्षरतेचा कार्यक्रम राबवीण्यासाठी चला जाणुया नदीला ही मोहीमही राबविली जात आहे. या सर्व पर्यावरणपुरक कामांचा स्वयंस्फुर्त आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी वाघाडी येथे देऊन वर्षभरातील कामांचा आढावा घेत पुढील कामांचे नियोजनाकरिता प्रशासनातील संबंधित विभागांनीही आवर्जुन सहकार्य करण्याच्या सुचना केल्या.
यामध्ये नगर परिषदेने स्वच्छतागृह बांधण्याचे बघावे. जलसंधारण विभागाने नदीकाठी वृक्षलागवडीसाठी नियोजन करुन या क्षेत्रातील शक्य त्या तांत्रीक कामे पावसाळ्यापुर्वी आटोपावी. सुरुवात करावी वृक्षारोपण व संबंधित कामांमध्ये वनविभागाने मदत करावी. रस्त्यावरील नालीचे बांधकाम पुढे वाढवीण्यासाठी संबंधित विभागाकडुन कार्यवाही व्हावी. या परिसर तथा कचराकुंडातील कचरा नियमीत व ठराविक वेळेत घेऊन जाण्याचे नियोजन नगर परिषदेने करावे. ढाळीचे बांध, पिचींग, वनराई बंधारे, खंदक, वृक्षारोपण आदी कामांचे नियोजन करावे, शक्य असेल ती कामे पुर्ण करणे. जनजागृतीपर उपक्रमांवर भर देणे, गणेशोत्सव व नवरात्री दरम्यानच्या समाजोपयोगी कार्यक्रमांच्या दृष्टीने आतापासुन तयारी करणे. वाघाडीतील काय कामे झाली, कोणती कामे अपुर्ण आहेत, प्रशानसनाकडुन आणखी काय काय अपेक्षित आहे. कोणती कामे रखडलीत कर नाही ना याविषयांमध्ये त्या त्या विभागाने पाठपुरावा व अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याच्या सुचनाही प्रशासकिय अधिकाऱ्यांना केल्या. या कामांमध्ये वाघाडीसह यवतमाळातील संस्था, संघटनांचे सदस्य, निसर्गप्रेमी, यवतमाळकरांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रामुख्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे, पोलीस उपअधीक्षक यशोधरा मुनेश्वर, जीएसटी सहआयुक्त एकनाथ पावडे, गृहरक्षक दलाचे निरंजन मलकापुरे, डाँ. विजय अग्रवाल, अजय मुंधडा, राजु निवल, अश्विन सवालाखे, सुरज मडगुलवार, पुनम जयपुरिया, स्नेहा टावरी, अविनाश बोबडे, किशोर शिंदे, शुभम पंचभाई, आशिष कांबळे, रामचंद्र ढोबळे, इसु माळवे, उत्तमराव मानकर, संतोष भोयर, भुषण क्षीससागर, अविनाश धनेवार, वर्षा पडवे, मिनाक्षी ढोबळे, यामिनी घरत यांचेसह वाघाडीला नियमीत सहभागी असलेल्या पर्यावरण संरक्षण समिती, टीडब्ल्युजे फाउंडेशन, यवतमाळ प्लाँगर्स, जनसेवा फाउंडेशन, एस एल फाउंडेशन, बी काईंन्ड, वसुंधरा फाउंडेशन, अस्तीत्व फाउंडेशन, वाघाडी सेवा समिती आदी संस्था, संघटनांचे सदस्यांनी झाडांना पाणी देणे, झाडांना आळे करणे, परिसर प्लास्टीकमुक्त करणे, खतनिर्मीती प्रकल्पासाठी कचरा गोळा करणे आदींसाठी श्रमदान केले.
—————–
चौकट
*इकोब्रिक्सचा पहिलाच उपक्रम*
यवतमाळातील पहिली इकोब्रिक्सची पार आणि झाडांभोवती करण्यात आलेली इकोब्रिक्सची पार (चबुतरा) आणि पंचवटी वृक्षांच्या भोवती करण्यात आलेल्या इकोब्रिक्सच्या पाळीचे जिल्हाधिकारी तसेच मान्यरांच्या हस्ते पुजन करुन लोकार्पण करण्यात आले. अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या सहाय्याने झालेल्या या उपक्रमाद्वारे प्लास्टीकमुक्ती चा संदेश देण्यात येत आहे.
—————-
चौकट
*कचराकुंडाचे लोकार्पण*
अतिथींनी टीडब्ल्युजे तर्फे सहाय्यीत कचराकुंडाचे पुजन करुन त्याचे लोकार्पण केले. या कचरा कुंडीमध्ये ओला व सुका कचरा टाकरण्याची स्वतंत्र व्यवस्था असुन तत्पुर्वी वाघाडी येथे ३ निर्माल्यकुंड लावण्यात आले आहेत. वाघाडी परिसरातच या निर्माल्यापासुन तसेच ओल्या कचऱ्यापासुनचा खतनिर्मीर्ती प्रकल्पही सुरु करण्यात आला आहे. वाघाडीचा परिसर प्लास्टीकमुक्त ठेवण्यासाठी या कुंडाची मदत होणार आहे.
—————–
चौकट
*महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन*
टीडब्ल्युजे फाउंडेशनच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या आरोग्यपर मार्गदर्शन सत्रामध्ये डाँ मनस्वी लोहाणा मॅडम यांनी महिलांना हेल्थ टिप्स देऊन त्यांच्या शंकांचे समाधानही केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक यशोधरा मुनेश्वर तसेच गृहरक्षक दलाच्या संगीता मोहोड उपस्थित होत्या. संस्था, संघटनांच्या महिला सदस्य, नगर परिषदेच्या महिला कर्मचारी, शिक्षीका, गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.