
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील सरपंच रेखाताई निलेश मेश्राम हिचे विरुद्ध 0 विरुद्ध 8 मतांनी अविश्वास ठराव आज पारित करण्यात आला.
निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून घाटंजीचे परिविक्षाधीन तहसीलदार मोहनिश शेलवटकर हे होते. तसेच अविश्वासाचे प्रोसिडींग रजिस्टर झटाळा ग्रामपंचायतचे सचिव पदमाकर दौड यांनी लिहले. या प्रसंगी निवडणूक अध्यासी अधिकारी मोहनिश शेलवटकर यांना निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड, कुर्लीचे मंडळ अधिकारी प्रवीण कांबळे, झटाळा येथील तलाठी देवानंद किणाके आदींनी सहकार्य केले.
यावेळी पारवा पोलीसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अखेर झटाळा येथील सरपंच रेखाताई मेश्राम यांचे वर अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने त्या आज सरपंच पदावरुन पाय उतार झाल्या आहे.











































