Home यवतमाळ आदिवासी समाजाच्या हितासाठी काँग्रेस कटिबध्द – प्रा. पुरके

आदिवासी समाजाच्या हितासाठी काँग्रेस कटिबध्द – प्रा. पुरके

124

बचत भवनला पार पडला आदिवासी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा…!

यवतमाळ /प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था सह विधानसभा – लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच सर्वच पक्ष सक्रिय होताना दिसून येत आहे. नुकत्याच कर्नाटक निकालानंतर काँग्रेस पक्षातील मळभ दुर लोटून पक्ष पदधिकारी जोमाने कामाला लागले आहे. मेळावे, संमेलने, बैठका, भेटीगाठी, चर्चा सत्राचा धडाका काँग्रेस कडून सुरू झाला. नुकत्याच कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या “निर्भय बनो” नंतर काल शहरातील मेडिकल चौक परिसरातील सेलिब्रेशन सभागृहात आदिवासी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता.

काँग्रेस पक्ष सर्व जातीपातीना घेउन चालणारा पक्ष असून सर्व समावेशक हित पक्ष जोपासत आला तर आदिवासी समाजाच्या हितासाठी नेहमीं अग्रेसर असल्याची भूमिका कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके सर यांनी मांडली. जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार झाला तेव्हा तेव्हा काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचा इतिहास त्यांनी आपल्या भाषणातून विषद केला. नुकत्याच नवीन संसदेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रपतीना आमंत्रित न केल्याने काँग्रेस आक्रमक झाली तर आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात निषेध ही नोंदविण्यात आला होता. त्यामुळे आदिवासी समाजाच्या हितासाठी व अन्याय अत्याचारा विरोधात पेटून उठण्यास काँग्रेस कटिबध्द असल्याचे वक्तव्य प्रा. पुरके यांनी यावेळी केले.
आज पार पडलेल्या आदिवासी काँग्रेस कमिटीच्या मेळाव्या दरम्यान आदिवासी काँग्रेस कमिटीच्या जिल्हा, तालुका व शहर कार्यकारण्या ही घोषित करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुध्दा उपस्थितांकडून करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून भाऊराव मरापे सर यांची निवड करून आदिवासी काँग्रेस कमिटीची जबाबदारी त्यांच्या कडे सोपविण्यात आली. तर यवतमाळ शहरची जबाबदारी नगर परिषदचे मा. आरोग्य सभापती नंदू कुडमेथे यांच्यावर सोपविण्यात आली. याच बरोबर इतर तालुका व शहरच्या कार्यकारण्या घोषीत करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या प्रसंगी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके सर तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकरावजी मेश्राम, एम.के.कोडापे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे, किरणभाऊ कुमरे, रमेशभाऊ भिसनकर हे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व आदिवासी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हयातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते..

****चौकट******
आदिवासी समाजाच्या हितासाठी युवकांनी सामोरे यावे – जितेंद्र मोघे
आदिवासी बहुल भागात अनेक समस्या आणि सुविधांचा अभाव असल्यामुळे एवढ्या आधुनिक युगात सुध्दा समाजाची फरफट होताना दिसून येत आहे. त्यामुळे समाजाच्या हितासाठी समाजातील युवकांनी सामोरं येऊन काम करणे गरजेचे आहे. यामुळे आज अनेक इच्छुक आणि तळमळीच्या कार्यकर्त्यांना आपण पदे देउन त्यांच्यावर ही जबाबदारी देत आहों. समाज आणि प्रशासन यातील दुवा म्हणून हे पदाधिकारी यापुढे कार्यरत राहुन भविष्यात समाजाचं हित साधतील अशी अपेक्षा यावेळी मोघे यांनी व्यक्त केली.