Home पश्चिम महाराष्ट्र “पत्रकार संरक्षण समिती”, पंढरपूर च्या अध्यक्षपदी शंकरराव पवार तर कार्याध्यक्षपदी भारत शिंदे

“पत्रकार संरक्षण समिती”, पंढरपूर च्या अध्यक्षपदी शंकरराव पवार तर कार्याध्यक्षपदी भारत शिंदे

156

पंढरपूर,ता 25 ः पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक अशोक गोडगे, नंदकुमार देशपांडे, उमेश टोमके यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संघटनेच्या पंढरपूर येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी शंकरराव पवार (दै.पुण्यनगरी), कार्याध्यक्षपदी भारत शिंदे (न्युज इंडीया) तसेच उपाध्यक्षपदी लखन साळुंखे (महाराष्ट्र क्राईम न्युज), सचिवपदी अनिल सोनवणे (जागर न्युज), खजिनदारपदी लिंगेश भुसनर (खबर 24), प्रसिद्धी प्रमुखपदी सलीम मणेरी (दै.बाळकडु), यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक गोडगे यांच्या हस्ते सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी अध्यक्ष विरेंद्रसिंह उत्पात (न्युज 18 लोकमत) , जाकीर नदाफ (एस. प्राईम न्युज), श्रीकांत कसबे (जोशाबा टाईम्स), राजेश शिंदे (दै.अपडेट माझा पेपर) तसेच डॉ. शिवाजी पाटोळे (पंढरपूर लाईव्ह न्युज), डॉ. राजेश फडे (ज्ञानप्रवाह), सचिन दळवे (दै,जनपथ, इनो न्युज), सुदर्शन खंदारे (पंढरी उदय), गौतम जाधव (विठ्ठल टाईम्स्), लक्ष्मण जाधव (कनकंबा एक्सप्रेस), विकी साठे (बातमी 24 तास), मुकूंद माने-देशमुख (गँगवार), शंकरराव कदम (धन्यवाद), उत्तम अभंगराव (एस.पी. पंढरी), गणेश गायकवाड (ए.बी. न्युज), शरद कारटकर , धीरज साळुंखे, संजय हेगडे (दै.सकाळ तिसंगी), अशोक पवार (फर्स्ट न्युज महाराष्ट्र), अमोल कुलकर्णी (दै.राष्ट्रसंचार), आनंद भोसले, राजकुमार घाडगे (दै.सकाळ) आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.