Home सोलापुर वृत्तपत्र विक्रेत्यांना मोफत ब्रॅण्डेड कपड्यांचे वाटप

वृत्तपत्र विक्रेत्यांना मोफत ब्रॅण्डेड कपड्यांचे वाटप

111

.
अक्कलकोट दि,१४- इंडियन प्रेस क्लब सोलापूर जिल्हा यांच्या वतीने आज राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांना ब्रॅण्डेड कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम सोलापूर रोड येथील प्रेसिडेंट पॅलेस च्या सभागृहात समारंभपूर्वक पार पडला.
अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते. प्रमुख पाहुने म्हणून इंडियन प्रेस क्लब चे राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार हे उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत इंडियन प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांनी केले
भारताच्या दक्षिण टोकावरील एका छोट्या खेड्यातला छोटा वृत्तपत्र विक्रेता ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणाऱ्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस,१५ ऑक्‍टोबर, हा दिवस “राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोचवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “इंडियन प्रेस क्लबचे” जिल्हाध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने हा राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करण्यात आला.गेली चाळीस वर्षे वृत्तपत्र वाटण्याचा काम करणाऱ्या चाळीस पेक्षा अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांना संपूर्ण रेमंड कंपनीचे पॅन्ट शर्ट भेट देण्यात आले.डॉ.कलाम यांची प्रेरणा म्हणजे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी कलाम त्यांच्या चुलतभावाबरोबर वृत्तपत्र वितरणाचे काम करीत असत.वृत्तपत्र वितरणाच्या कामातून झालेल्या आपल्या पहिल्या वहिल्या कमाईने जागृत केलेली आत्मसन्मानाची भावना आज पन्नास वर्षांनंतरही आपल्याला जाणवत राहते, असा उल्लेख डॉ. कलाम यांनी “विंग्ज ऑफ फायर’ या त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.या वेळी बोलताना बसवपीठ मुगळी च्या प्रमुख पूज्य महानंदाताई हिरेमठ यांनी वृत्तपत्र वाटपाचं काम करणाऱ्या युवकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन त्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे असे आव्हान शासनाला केले.
वृत्तपत्र वाटपाचं काम करणाऱ्या सर्व युवकांना रेमंड कंपनीचे पॅन्ट शर्ट मोफत भेट देण्यात आले.यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी वृत्तपत्र वाटणाऱ्याचं जीवन अत्यंत खडतर असून त्यांच्यासाठी पेन्शन योजना शासनाने लागू करावे यासाठी आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतीले, दैनिक पुढरीचे उपसंपादक जगन्नाथ हुक्केरी,अरुण जाधव,सुधीर माळशेट्टी, डॉ. रवींद्र बनसोडे,काशिनाथ मामा गोळे, नागेश कोनापुरे, अमरीश हरवाळकर,दत्ता हरवाळकर,आनंद खजूरगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
.

चौकट:
दररोज पहाटे उठून पेपर वाटणाऱ्या सुमारे चाळीस पेक्षा अधिक वृत्तपत्र विक्रेत्यांना रेमंड कंपनीचे पॅन्ट शर्ट आणि फेटा बांधून त्यांचे सोलापूर जिल्हा इंडियन प्रेस क्लब च्या वतीने सन्मान केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.
.